कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

४१,९५१ एकूण रुग्ण तर ८२१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू
178 new patients and 5 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


४१,९५१ एकूण रुग्ण तर ८२१ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,९५१ झाली आहे. यामध्ये ३८८१ रुग्ण उपचार घेत असून ३७,२४९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४४, कल्याण प – ३४, डोंबिवली पूर्व ५५, डोंबिवली प- ३८, मांडा टिटवाळा – ६, तर मोहना येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

________

Also see : लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

https://www.theganimikava.com/The-glory-of-the-remarkable-work-of-the-lockdown-period