कल्याण डोंबिवलीत  १९६ नवे रुग्ण तर ५  जणांचा मृत्यू  

४६,६१२ एकूण रुग्ण तर ९१३  जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४४२ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत  १९६ नवे रुग्ण तर ५  जणांचा मृत्यू   
196 new patients and 5 deaths in Kalyan Dombivali

 

कल्याण डोंबिवलीत  १९६ नवे रुग्ण तर ५  जणांचा मृत्यू

 

४६,६१२ एकूण रुग्ण तर ९१३  जणांचा आतापर्यंत मृत्यू

 

तर २४ तासांत ४४२ रुग्णांना डिस्चार्ज

 

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,६१२ झाली आहे. यामध्ये ३१२२ रुग्ण उपचार घेत असून ४२,५७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९१३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४५, कल्याण प – ६३, डोंबिवली पूर्व ५१, डोंबिवली प- २६,  मांडा टिटवाळा – ३, मोहना – ५, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण,ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

____________

Also see : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

https://www.theganimikava.com/CM-orders-immediate-inquiry-into-power-outage-in-Mumbai-metropolitan-area