28 पोकलेन, 60 टिपर कामाला, अजितदादांनी मनावर घेतलं तर काय बदल होऊ शकतो पहा बारामतीच्या नीरा डावा कालवा चे नूतनीकरण करून रूपच पालटले !
शहराची जीवनवाहिनी असलेला नीरा डावा कालवा अनेक वर्षांनंतर कात टाकतो आहे....

28 पोकलेन, 60 टिपर कामाला, अजितदादांनी मनावर घेतलं तर काय बदल होऊ शकतो पहा बारामतीच्या नीरा डावा कालवा चे नूतनीकरण करून रूपच पालटले !
शहराची जीवनवाहिनी असलेला नीरा डावा कालवा अनेक वर्षांनंतर कात टाकतो आहे. बारामतीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला नीरा डावा कालवा येत्या काही दिवसात बारामतीच्या सौंदर्यस्थळांपैकी एक म्हणून गणला जाईल.
बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याचे मजबूतीकरण, नूतनीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतले.
जलसंपदा विभागाच्या साठवण तलावाच्या कामातून निघालेला मुरुम वापरुन सहा कि.मी. लांबीच्या या कालव्याचे मजबूतीकरण करण्यात आले आहे. या साठी कोणतीही स्वतंत्र निविदा किंवा निधी देण्यात आला नाही. जलसंपदा विभागाचेच 28 पोकलेन, 60 टिपर, 4 व्हायब्रेटर वापरुन फक्त डिझेलच्या खर्चातून हे काम केले गेले. यातही 12 टिपर लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात आले होते.
• नागरिकांसाठी होणार वॉक वे
• ओपन जिम
• बसण्यासाठी सोळा ठिकाणी जागा
• फिरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका
• विविध ठिकाणी विद्युतीकरण
• काही ठिकाणी लँडस्केपिंग
• तीन हत्ती चौकात होणार सिटी सेंटर टाऊन हॉल.
तीन हत्ती चौकाचा होणार सिटी सेंटर...!
शहरातील तीन हत्ती चौकाचे स्वरुप आमूलाग्र बदलले जाणार असून येथे सिटी सेंटर टाऊन हॉल अशी संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. पूलाची रुंदी वाढवून सुशोभिकरण करुन रस्ता वळवून येथे अत्यंत सुंदर चौक अस्तित्वात येणार आहे. वाहतूकीची कोंडी टाळण्यासह शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा सिटी सेंटर होईल. लवकरच याचे काम सुरु होणार आहे.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
_________
Also see : केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी
https://www.theganimikava.com/KDMC-health-inspectors-inspected-Karjat-dumping-project