कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
३९,४६८ एकूण रुग्ण तर ७८० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५७८ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवलीत २९६ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
३९,४६८ एकूण रुग्ण तर ७८० जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत ५७८ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण (kalyan): कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २९६ कोरोना (corona) रुग्णांची नोंद आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या २९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३९,४६८ झाली आहे. यामध्ये ४८५९ रुग्ण उपचार घेत असून ३३,८२९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २०, कल्याण प – १५४, डोंबिवली पूर्व ८६, डोंबिवली प- २५, मांडा टिटवाळा –८, मोहना –२, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
_______
Also see : कल्पना गायकवाड यांचे मुरबाड तहसील समोर अमरण उपोषण
https://www.theganimikava.com/Kalpana-Gaikwad-hunger-strick-in-front-of-Murbad-tehsi