कल्याण डोंबिवलीत  ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

४५,८७६ एकूण रुग्ण तर ८९६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत  ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
334 new patients and 6 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत  ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

४५,८७६ एकूण रुग्ण तर ८९६ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३३४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३३४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४५,८७६ झाली आहे. यामध्ये ३५२१ रुग्ण उपचार घेत असून ४१,४५९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३३४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६३, कल्याण प – ११३, डोंबिवली पूर्व ८१, डोंबिवली प- ६३, मांडा टिटवाळा – ७, मोहना – ६, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२० रुग्ण टाटा आमंत्रामधून,  ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

__________

Also see : गोहत्या, गोतस्करी, तसेच अवैध पशुवधगृहांवर प्रतिबंध कधी लागणार ? - श्री. संजय शर्मा, श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन

https://www.theganimikava.com/What-is-the-system-on-cow-slaughter-Gotaskari-as-well-as-illegal-slaughterhouses-Mr-Sanjay-Sharma-Srishivatrapati-Goraksha-Jan-Andolan