कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

४४,७८१ एकूण रुग्ण तर ८७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू
389 new patients and 9 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

४४,७८१ एकूण रुग्ण तर ८७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका  आज नव्या ३८९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३८९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,७८१  झाली आहे. यामध्ये ३४२९ रुग्ण उपचार घेत असून ४०,४७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३८९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७४, कल्याण प – ११२, डोंबिवली पूर्व १३४, डोंबिवली प- ४९, मांडा टिटवाळा – ८, मोहना – ७, तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५  रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून,  ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे  

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________

Also see : केडीएमटीची बस सेवा पनवेल वाशी मार्गावर सुरु करण्याची मनसेची मागणी

https://www.theganimikava.com/MNS-demands-to-start-KDMT-bus-service-on-Panvel-Vashi-route