कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

३९,१७२ एकूण रुग्ण तर ७७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५८८ रुग्णांना डिस्चार्ज....

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू
413 new patients and 5 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ४१३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

३९,१७२ एकूण रुग्ण तर ७७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ५८८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४१३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ४१३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३९,१७२ झाली आहे. यामध्ये ५१४८ रुग्ण उपचार घेत असून ३३,२५१  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४१३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७९, कल्याण प – ११४, डोंबिवली पूर्व १२१, डोंबिवली प- ७६, मांडा टिटवाळा –१६, मोहना –६, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

______

Also see : शिक्षक उमेदवार जी. के. थोरात सर यांची आज शिवभूमी माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर ला सदिच्छा भेट...

https://www.theganimikava.com/Teacher-candidate-GK-Thorat-Sir-pays-a-courtesy-call-on-Shivbhoomi-Secondary-School-Khed-Shivapur-today