ठाण्यातील सोशल डिस्टिंगचे पालन न केल्यामुळे 8 दुकानं सील करण्यात आली 

ठाणे सोशल डिस्टिंगचे पालन न करण्याबरोबरच लॉकडाऊन नियमांचे उलंघन करण्यावर ठाणे महानगरपालिकेने केली कारवाई......

ठाण्यातील सोशल डिस्टिंगचे पालन न केल्यामुळे 8 दुकानं सील करण्यात आली 
8 shops were sealed in Thane for non-compliance with social Distancing

ठाण्यातील सोशल डिस्टिंगचे पालन न केल्यामुळे 8 दुकानं सील करण्यात आली 

ठाणे (thane) सोशल डिस्टिंगचे पालन न करण्याबरोबरच लॉकडाऊन नियमांचे उलंघन करून रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने (muncipal coroporation) कडक कारवाई केली असून,  या कारवाई मध्ये एकूण आठ दुकाने सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेच्या (muncipal coroporation) नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत तलावपाळी आणि चिंतामणी चौक या परिसरात काही दुकाने रात्री सात नंतरही आपली दुकाने उघडी ठेऊन लॉकडाउनच्या नियमांचे तसेच सोशल डिस्टिंगचे (social Distancing) पालन करीत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या कडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांनी सोमवारी संध्याकाळी अतिक्रमण पथकाच्या साहयाने एकूण 8 दुकानांवर कारवाई करून ती दुकाने सील केली. या दुकानांमध्ये पिझ्झा सॅन्डविच कुल्फी आयस्क्रीम आदी दुकानांचा समावेश आहे.

भिवंडी, ठाणे  

प्रतिनिधी - सत्यवान तरे

______

Also see :संघाच्या युवकांचे कोरोणाच्या संकटकाळात अथक सेवाकार्य सुरू

https://www.theganimikava.com/The-youth-of-the-Sangh-continue-their-tireless-service-during-the-crisis-of-Korona