कल्याण डोंबिवलीत महिनाभरात ८४९९ रुग्ण तर १८८ जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ४२ हजारांचा टप्पा ४८२ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू ४२,४३३ एकूण रुग्ण तर ८२६ जणांचा आतापर्यंत मृत्यू...

कल्याण डोंबिवलीत महिनाभरात ८४९९ रुग्ण तर १८८ जणांचा मृत्यू
8499 patients and 188 deaths in Kalyan Dombivali in a month

कल्याण डोंबिवलीत महिनाभरात ८४९९ रुग्ण तर १८८ जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ४२ हजारांचा टप्पा

४८२ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

४२,४३३ एकूण रुग्ण तर ८२६ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४६० रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एका महिनाभरात तब्बल ८४९९ रुग्ण वाढले असून १८८ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर कोरोना रुग्णांच्या संख्येने ४२ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ४८२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिकेचा रिकव्हरी रेट ८८.८७ असून मृत्यू दर १.९५ आहे.

आजच्या या ४८२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४२,४३३ झाली आहे. यामध्ये ३८९८ रुग्ण उपचार घेत असून ३७,७०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४८२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७७, कल्याण प – १४६, डोंबिवली पूर्व १५८, डोंबिवली प- ८५, मांडा टिटवाळा – १२, मोहना – ३, तर पिसवली येथील एका  रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण,ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

___________

Also see : ‘राज’सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू – संदीप देशपांडे

https://www.theganimikava.com/Lets--pay-the-bill-with-interest-when-the-Raj-government-comes-Sandeep-Deshpande