कौशल्य विकासावर आधारित नवीन शैक्षणिक धोरण डॉ. वसंत काळपांडे यांचे प्रतिपादन
लायन्स क्लब सफाळे'तर्फे थँक्स अ टीचर उपक्रम
कौशल्य विकासावर आधारित नवीन शैक्षणिक धोरण डॉ. वसंत काळपांडे यांचे प्रतिपादन
लायन्स क्लब सफाळे'तर्फे थँक्स अ टीचर उपक्रम
कोणत्याही देशाचे शैक्षणिक (Academic) धोरण हे त्या देशाच्या विकासाचे धोतक आहे. मातृभाषेतील शिक्षणाला विशेष महत्त्व देऊन कौशल्य विकासावर आधारित असलेले नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. टप्प्याटप्प्याने या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. हे धोरण प्रत्येकाने प्रथमतः समजून घेणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनाच्या (teachers day) निमित्ताने लायन्स क्लब ऑफ सफाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या आधुनिक वाटा या विषयावर ऑनलाइन वेबिनार नुकताच आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ. काळपांडे बोलत होते. सुमारे ३४ वर्षानंतर केंद्र सरकारने (central gov) नवीन शैक्षणिक धोरणाला २९ जुलै २०२० रोजी मान्यता दिली आहे. या धोरणामध्ये इयत्ता पाचवी पर्यंतचे विषय मातृभाषेतून शिकवले गेले पाहिजेत असे म्हटले आहे, परंतु हे बंधनकारक नाही. समूह शाळेच्या संकल्पने बरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. नवीन शैक्षणिक धोरणात ५+३+३+४ असा आकृतीबंध असून अनेक स्वागतार्ह बदल या धोरणामध्ये केले आहेत. २०३० पर्यंत हे धोरण पूर्णपणे अंमलात येईल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुंबई (mumbai) येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गो. वी. पारगावकर यांनी अनुभवातून अनुभूती असे शिक्षण अपेक्षित असून प्रत्यक्ष धोरण आणि त्याची अंमलबजावणी यामध्ये खूप फरक आहे असे सांगून प्रत्येक शाळेत अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक हे १९६८ च्या धोरणामध्ये नमूद असूनही आजतागायत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली नाही. शासनाने शारीरिक शिक्षण (Physical education) विषय आणि शिक्षकाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व समृद्धीसाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य शिक्षण (Health education) व शारीरिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तर प्रसिद्ध शिक्षण तज्ञ निलेश निमकर यांनी नवीन शैक्षणिक (education) धोरणात बाल शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या धोरणात बालवाडी पासून इयत्ता दुसरी पर्यंतचे शिक्षण हा बालशिक्षणाचा भाग असेल. बालसंगोपन आणि बाल शिक्षण देणाऱ्या व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण निर्मिती त्या-त्या राज्याने करावयाची आहे असे सांगितले. यावेळी शिक्षकांच्या विविध शंकांचे शिक्षण तज्ज्ञांनी निराकारण केले. या वेबिनारचे उद्घाटन डिस्ट्रिकगव्हर्नर शशिकांत मोध यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. ज्योतिबा कडाली उपस्थित होते. याप्रसंगी सफाळे लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. तारानाथ वर्तक यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उद्बोधन करणेबाबत या वेबीनारचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.
या वेबिनारच्या प्रास्ताविकात प्रोजेक्ट चेअरमन प्रमोद पाटील यांनी, शिक्षक दिनाच्या (teachers day) निमित्ताने शासनाच्या थॅंक्स अ टीचर अभियानांतर्गत समाजात शिक्षकांचे स्थान अत्यंत मोलाचे असून शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असे सांगितले. लायन्स क्लब ऑफ सफाळे सेक्रेटरी दिनकर वर्तक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. ह्या वेबिनारमध्ये घर जिल्ह्याबरोबरच राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
_________
Also see : पालघरमधील धामणी धरणाचे दरवाजे उघडले | Dhamni Dam | Palghar
https://www.theganimikava.com/3-of-5-doors-opened-of-dhamni-dam-palghar