ए.टी.एम. चोरी करणारे टोळीचा मास्टर माइंड गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन ताब्यात.

थरमॅक्स चौकाकडुन के.एस.बी. चौकाकडे जाणाऱ्या रोडचे लगत असलेले आय.आय.सी.आय बँकेच ए.टी.एम. फोडुन त्यातील पैसे चोरी केलेल्या टोलीस गुन्हे शाखा, युनिट 5 ने केले अटक.

ए.टी.एम. चोरी करणारे टोळीचा मास्टर माइंड गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन ताब्यात 

 मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री संदिप बिष्णोई यांनी राबविलेल्या पाहीजे फरारी मोहीमे अंतर्गत श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड यांनी पाहीजे फरारी आरोपी शोधणेकरीता गुन्हे शाखा युनिट 5 कडील अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत करुन सुचना दिल्या होत्या. आदेशाप्रमाणे कारवाई करीत असताना गुन्हे शाखेडकील पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व नितीन बहिरट यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 218/2020 भादविक 457, 380, 427, 34 प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये एम.टी.एम. फोडुन चोरी केलेले ए.टी.एम. मशीन हे मेहरबानसिंग तारासिंग डांगी याने अगोदर रेकी करुन कधी चोरी करायचे हे ठरविले होते. दि 09/06/2020 रोजी त्याचे साथिदार नामे रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांचेसह दाखल गुन्हा केला असुन तो सेंट्रल चौक येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमीचा आशय श्री.बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 यांना कळविला असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 5 कडील सपोनि राम गोमारे व पोलीस कर्मचारी यांचे एक शोध पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

 त्यावर सदरचे शोध पथक मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन दबा धरुन थांबलेले असताना मेहरबानसिंग तारासिंग डांगी हा तेथे आला त्याला पोलीसांचा संशय आल्याने तो तेथुन पळ काढु लागला त्यास शोध पथकाने शिताफिने पकडुन ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचेकडे गुन्हे शाखा, युनिट 5 कार्यालय येथे आणुन अधिक सखोल तपास केला असता त्याने त्याचे नाव मेहरबानसिंग तारासिंग डांगी, वय 25 वर्षे, धंदा मजुरी, रा महानगर पालिका व्यायामशाळेजवळ, राजनगर, ओटा स्किम, निगडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याला त्याचे सांथिदार यांचेबाबत विचारणा केली असता त्याने रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे हे त्याचे साथिदार असल्याचे सांगितले.  त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व 1. रामजितसिंग टाक, 2. अजयसिंग दुधानी, 3. पापासिंग दुधानी व 4. श्रीकांत धोत्रे यांनी दि 08/06/2020 रोजी रात्री 12.00 वाजण्याचे सुमारास थरमॅक्स चौकाकडुन खंडोबामाळ येथे जाणारे रस्तावरील आय.सी.आय.सी बँकेचे ए.टी.एम. चोरी करण्यास गेले असता तेथे थोडे अंतरावर त्यांना पोलीसांची गाडी आली असल्याचे दिसताच ते तिकडुन पळुन गेले त्यानंतर काही वेळाने त्यांनी मिळुन थरमॅक्स चौकाकडुन के.एस.बी. चौकाकडे जाणारे रोडचे लगत असलेले आय.आय.सी.आय बँकेच ए.टी.एम. फोडुन त्यातील पैसे चोरी केले असल्याचे कबुल केले आहे. सदर बाबत पोलीस अभिलेख तपासला असता निगडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 218/2020 भादविक 457, 380, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

 तसेच सदर गुन्हयामध्ये वापरण्यात आलेली गाडी 1. मेहरबानसिंग डांगी, 2. रामजितसिंग टाक, 3. अजयसिंग दुधानी, 4. पापासिंग दुधानी व 5. श्रीकांत धोत्रे यांनी मिळुन लोणीकाळभोर जवळील अवताडेवाडी येथे एक महिंद्रा कंपनीची पिक अप गाडी चोरी केली असल्याचे कबुल केले आहे. सदर बाबत पोलीस अभिलेख तपासला असता लोणकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 410/2020 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

 तसेच 1. मेहरबानसिंग डांगी, 2. रामजितसिंग टाक, 3. अजयसिंग दुधानी, 4. पापासिंग दुधानी व 5. श्रीकांत धोत्रे यांनी मिळुन मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एच.डी.एफ.सी. बँकेचे ए.टि.एम. फोडुन चोरी केली असलेबाबत कबुली दिली आहे. सदर बाबत पोलीस अभिलेख तपासला असता लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 191/2020 भादविक 380, 427, 511 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
 मेहरबानसिंग तारासिंग डांगी, वय 25 वर्षे, धंदा मजुरी, रा महानगर पालिका व्यायामशाळेजवळ, राजनगर, ओटा स्किम, निगडी पुणे यास निगडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 218/2020 भादविक 457, 380, 427, 34 चे पुढील तपासकामी निगडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. 
 गुन्हे शाखा, युनिट 5 कडुन गेल्या 10 दिवसांमध्ये दरोडा या गुन्हयातील 04, दरोडा तयारी, जबरी चोरी, आत्महत्येस प्रवृत्त करणे व ए.टी.एम. चोरी अशा 08 गंभरी गुन्हयांमधील एकुण 08 आरोपींना ताब्यात घेतले असुन ते खालीलप्रमाणे 
1. ऋतिक श्रीपती सूर्यवंशी वय 22 रा राजनगर निगडी हा आझाद चौक निगडी व 
2. आकाश गजानन कांबळे, वय 22 वर्षे, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी, पुणे. (देहुरोड पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. 602/2018 भादविक 395 मध्ये 02 वर्षांपासुन पाहिजे आरोपी ) 
3. दिनेश उमापती हेगडे वय 20 रा शितलानगर देहूरोड हा कुणाल हॉटेल समोर शितला नगर देहूरोड (देहूरोड पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. 1067/2019 भादविक 395 मधील पाहिजे आरोपी) 
4. अशोक नाना महापुरे, वय 26 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा गोळेवाडी, आंबी ता मावळ जि पुणे मुळ रा मु.पो.पैठण, लक्ष्मीनगर औरंगाबाद (पैठण पोलीस स्टेशन गु.र.नं. 19/2020 भादविक 306 मधील पाहिजे आरोपी तसेच यावर औंरगाबाद ग्रामीण येथे इतर 06 गुन्हे आहेत. ) 
5. अजय ऊर्फ आज्या ऊर्फ अजित आशोक शिंदे वय 25 वर्ष रा.निमगाव दावडी ता. खेड जि. पुणे (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. 89/2016 भादविक 395 मधील पाहिजे आरोपी तसेच पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, अहमदनगर, रायगड येथे वेगवेगळे 07 गुन्हे असणारा कुख्यात आरोपी) 
6. शेऱ्या उर्फ ऋशीकेश राजु अडागळे, वय 21 वर्षे, धंदा मजुरी, रा पदमावती मंदिरासमोर, मौजे उर्से, ता. मावळ, जि पुणे (देहुरोड पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. 171/2020 भादविक 392, 504, 506, 34 मधील पाहिजे आरोपी तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील देहुरोड व परिसरामध्ये दहशतीचे वेगवेगळे 11 गुन्हे असणारा आरोपी )   
व 7. डॅनी उर्फ जाकिर कय्युम पठाण वय 19 रा इंदिरानगर ओटा स्कीम निगडी (भोसरी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. 584/2019 भादविक 395 आर्म ऍ़क्ट 4(25) मधील पाहिजे आरापी ) असे एकुण 08 पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 
 सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे व पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितिन बहिरट, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांनी केली आहे.

_____________