ऐस क्लासेसचा... पहिल्याच वर्षी दणदणीत निकाल. 

काळेवाडी रहाटणी परिसरातील तापकीर चौक काळेवाडी येथे प्रा कोल्हे सरांनी १० फेब्रुवारी २०१९ ला ऐस क्लासेसची स्थापना केली......

ऐस क्लासेसचा... पहिल्याच वर्षी दणदणीत निकाल

पिंपरी पुणे (pimpri pune) : काळेवाडी रहाटणी परिसरातील तापकीर चौक काळेवाडी येथे प्रा कोल्हे सरांनी १० फेब्रुवारी २०१९ ला ऐस क्लासेसची स्थापना केली. मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये क्लासच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. 

दहावी आणि बारावीचा 100% निकाल (result) लागला असून दहावीमध्ये कु. श्रुती खोसे या विद्यार्थिनीने ९८.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला, तर चि प्रणव मांजरे ९५.२०% व चि श्रीकर वडेकर ९५.२0% (द्वितीय), कु पूनम गव्हाणे व कु गायत्री नरळे (तृतीय) क्र्माकाने उतीर्ण झाले आहेत. क्लास मधील ९०%च्यापुढे-१७ विद्यार्थी, ८०% च्यापुढे-६२ विद्यार्थी असून अशाप्रकारे ऐस क्लासच्या विद्यार्थिनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

बारावी सायन्सचा (science) निकाल 100% लागल असून त्यामध्ये चि मयूर बेदरे- PCM -९०%  PCB- ८४.३३%. आणि गणित १०० पैकी ९८ गुण तर कु. शुभांगी सावंत PCM-८६.३३, PCB- ८६%. आणि गणित १०० पैकी ९६ आणि जीवाशात्र १०० पैकी ९० गुण. व गणित विषयामध्ये चि. आदित्य पाडळे ,कु शुभदा आहेर, चि ज्ञानराज जाधव या विद्यार्थ्यांना १०० पैकी ९५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

बारावीमध्ये क्लास मधुन बहिस्थ (१७ नंबर फॉर्म) विद्यार्थीही प्रविष्ट झाले होते.  त्याचाही 100% निकाल असून त्यामध्ये कु प्राजक्ता सगर ७६% PCM-७३% आणि गणितामध्ये 100 पैकी ९५ गुण व चि रेवन गुंजाळ ५६% मिळून यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्याप्रती प्रचंड निष्ठा व ध्येयवादी असणारे प्रा कोल्हे सरांनी विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे योग्य नियोजन, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अगदी सुरवातीपासूनच बोर्डाच्या परीक्षेची जय्यत तयारी चालू केले होती, यामध्ये विद्यार्थांना तब्बल आठ तास क्लासमध्ये बसून अभ्यास करण्यासाठी योग्य वातावरण, जास्तीचे सराव पेपर सोडवणे, विद्यार्थांच्या शंकांचे शिक्षकाकडून निरसन, डीजीटल क्लास रूम याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोफत देण्यात येणारी मोटीवेशन lectures याचा विद्यार्याना परिपूर्ण फायदा झाला, आणि त्याचेच फलित म्हणून ऐस क्लासला निकालाचे ध्येय पहिल्याच वर्षी साध्य झाले.

प्रा. कोल्हे सर यांना विद्यार्थ्याप्रती नेहमीच आत्मीयता असून “आपल्याकडे येणार विद्यार्थी रिकाम्या हाती न जाता त्याला भरभरून ज्ञानाची शिदोरी आपणास कशी देता येईल” याचच विचार सर नेहमी करीत असतात. विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती, त्याची बौद्धिक भूक, आणि प्रत्येक विद्यार्थी हा आपल्याच कुटुंबातील आहे असे मानून विद्यार्थां आणि पालकांमध्ये सरांनी एक विश्वास निर्माण केला. क्लासमध्ये वातानुकूलित वर्ग,  तंत्रज्ञानाचा वापर, वैयक्तिक लक्ष, अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक, आणि नियोजनात्मक शिस्तप्रियता, त्यामध्ये  पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि विद्यार्थीनी केलेली प्रचंड मेहनत यामुळेच आम्ही यशाचे शिखर गाठू शकलो. असे आवर्जुन कोल्हे सर सांगतात.

अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश स्रुरू आहेत. त्यामध्ये कोविड-19 मुळे 50% एकूण फीस मध्ये सवलत. अधिक माहितीसाठी ऑफिस ला भेट द्यावी,संपर्क-८९२८०९७७७७

पिंपरी, पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

________

Also see : १०६ वर्षीय वृद्ध महिलेने केली ७ दिवसात कोरोनावर मात

https://www.theganimikava.com/A-106-year-old-woman-defeated-Corona-in-7-days