महिला पोलिस नाईक लता पुराणे यांची कौतुकास्पद कामगिरी ; सामाजिक कार्यकर्त्या मिराताई शिंदे

अवघ्या चोवीस तासात विनयभंगांच्या गुन्ह्याचा तपास करत महिला ही गुन्ह्याच्या तपासा सारखी महत्वाची जबाबदारी सांभाळू शकतात हे दाखवून देत वरिष्ठांना अभिमान वाटावा अशी कौतुकास्पद कामगिरी केली.

महिला पोलिस नाईक लता पुराणे यांची कौतुकास्पद कामगिरी ; सामाजिक कार्यकर्त्या मिराताई शिंदे
Admirable performance of Women Police Naik Lata Purane

महिला पोलिस नाईक लता पुराणे यांची कौतुकास्पद कामगिरी ; सामाजिक कार्यकर्त्या मिराताई शिंदे

अवघ्या चोवीस तासात विनयभंगांच्या गुन्ह्याचा तपास करत महिला ही गुन्ह्याच्या तपासा सारखी महत्वाची जबाबदारी सांभाळू शकतात हे दाखवून देत वरिष्ठांना अभिमान वाटावा अशी कौतुकास्पद  कामगिरी केली.

श्रीगोंदे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल  लता  पुराणे यांना अंमलदार पदी पदोन्नती मिळताच  अवघ्या चोवीस तासात विनयभंगांच्या गुन्ह्याचा तपास करत महिला ही गुन्ह्याच्या तपासा सारखी महत्वाची जबाबदारी सांभाळू शकतात हे दाखवून देत वरिष्ठांना अभिमान वाटावा अशी कौतुकास्पद  कामगिरी केली.
 गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्याचा तपास,पंचनामा,स्थळपाहणी,आरोपी अटक करून, कोर्टात फिर्यादी चा 164 चा जबाब व दोषारोप पत्र दाखल केले.न थकता न थाबता वरिष्ठ अधिकारी यांनी सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली.आणि दाखवून दिले की महिला पोलीस देखील ठाणे अंमलदार, गुन्ह्याचा तपास व दिलेले बीट सांभाळू शकतात.

     बऱ्याच दा कामाच्या ठिकाणी महिलांना जबाबदारी चे काम न देता त्यांना जमणार नाही हे गृहीत धरून दुय्यम दर्जाची कामे दिली जातात.परंतु पो.नि. रामराव ढिकले व सहा.पो.नी.तेजनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी यांच्या मदतीने सदर गुन्ह्याचा तपास करत 24 तासात दोषारोप पत्र दाखल करू शकले व वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आत्मविश्वास वाढला अशी प्रतिक्रिया सौ लता पुराणे यांनी दिली.

     बहुधा चोवीस तासात गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल होण्याची ही या ठाण्यातील पहिलीच घटना असल्याने सर्व क्षेत्रातून महिला ठाणे अंमलदार लता पुराणे यांचे कौतुक होत आहे. . त्याबद्दल जिल्हा पोलीस दलात त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.तालुक्यातील एका गावात सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दिनांक 26 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता.

श्रीगोंदा प्रतिनिधि

आदेश उबाळे