पवाळे गावातील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी, स्वखर्चाने बसविले स्मशानभूमीवर छत्र

स्मशानभूमी मंजूर असतांना ही तिचे काम पूर्ण होत नसल्याने अखेर पवाळे गावातील तरुणांनी आपली प्रतीक्षा थांबवून स्वखर्चाने गावातील स्मशानभूमीवर पत्र्याचे छत्र बसविण्या कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

पवाळे गावातील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी, स्वखर्चाने बसविले स्मशानभूमीवर छत्र
Admirable performance of the youth of Pavale village

पवाळे गावातील तरुणांची कौतुकास्पद कामगिरी, स्वखर्चाने बसविले स्मशानभूमीवर छत्र

स्मशानभूमी मंजूर असतांना ही तिचे काम पूर्ण होत नसल्याने अखेर पवाळे गावातील तरुणांनी आपली प्रतीक्षा थांबवून स्वखर्चाने गावातील स्मशानभूमीवर पत्र्याचे छत्र बसविण्या कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार :
 
स्मशानभूमी मंजूर असतांना ही तिचे काम पूर्ण होत नसल्याने अखेर पवाळे गावातील तरुणांनी आपली प्रतीक्षा थांबवून स्वखर्चाने गावातील स्मशानभूमीवर पत्र्याचे छत्र बसविण्या कौतुकास्पद कामगिरी केली आहे.(Admirable performance of the youth of Pavale village)

मुरबाड तालुक्यातील पवाळे गावातील जीर्ण स्मशानभूमी नव्याने बांधण्यासाठी जन सुविधा अंतर्गत सन 2018 ते 2019 या काळात मंजूर करण्यात आली होती. मात्र श्रेयवाद व काम मिळविण्याच्या हट्टीपणामुळे ते बराच काळ रखडले गेले. 

 तर या स्मशानभूमीचा काम घेणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची एजन्सी ब्लॅक लिस्ट मध्ये वर्ग करावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग पत्रकार संघटनेचे मुरबाड तालुका खजिनदार गितेश पवार यांनी केली असून याबाबत पवाळे ग्रामस्थांनी धन्यवाद व्यक्त करीत आहे. त्यामुळे याबाबत आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Admirable performance of the youth of Pavale village)