अफगाणिस्तानमधील बौद्ध स्थळांची सुरक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैनिकांनी व युनिसेफने करावी..... दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन

चौथ्या ते पाचव्या शतका मधील बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मुर्त्या 2001 मध्ये तालिबान चे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन यांच्या सहकार्याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून या मुर्त्या नष्ट करण्यात आल्या होत्या.

अफगाणिस्तानमधील बौद्ध स्थळांची सुरक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैनिकांनी व युनिसेफने करावी..... दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन
Afghanistan Crisis

अफगाणिस्तानमधील बौद्ध स्थळांची सुरक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैनिकांनी व युनिसेफने करावी..... दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन

चौथ्या ते पाचव्या शतका मधील बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मुर्त्या 2001 मध्ये तालिबान चे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन यांच्या सहकार्याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून या मुर्त्या नष्ट करण्यात आल्या होत्या

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत यांच्या कडून ...
..
दिल्ली अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन पुन्हा एकदा येऊ घातल्यामुळे त्याठिकाणी असलेल्या बौद्ध ऐतिहासिक स्थळांना पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे, तो ओळखून संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिसेफ या संघटनेने शांतता सैनिकाच्या मदतीने या बौद्ध स्थळांना सुरक्षितता प्रदान करावी असे आव्हान आंबेडकरवादी मिशनच्या युनिव्हर्सल बुद्धिस्ट संघाने केली आहे.
चौथ्या ते पाचव्या शतका मधील बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मुर्त्या 2001 मध्ये तालिबान चे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन यांच्या सहकार्याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून या मुर्त्या नष्ट करण्यात आल्या होत्या.(Afghanistan Crisis)

इसवी सनाच्या 507 मध्ये उभारण्यात आलेल्या 35 मीटर उंचीची व इसवी सन 554 मध्ये उभारण्यात आलेली 53 मीटर उंचीची या दोन विशाल तम बुद्ध मूर्ती तालिबान्यांनी डायनामाइट लावून नष्ट केल्या. मार्च 2021 मध्ये त्या ठिकाणी लेझर च्या माध्यमातून ह्या मुर्त्या पर्यटकांना पुन्हा एकदा दाखवण्यासाठी प्रयत्न प्रारंभ करण्यात आले होते. गांधार शैलीतील या मुर्त्या व अजिंठा येथील नवव्या आणि दहाव्या गुंफेतील चित्र (मीरम शैली) मध्ये बरेच साम्य आढळते.2015 मध्ये बामयाना या शहराची निवड दक्षिण आशिया सांस्कृतिक राजधानी म्हणून करण्यात आली होती.


बामियान व अफगाणिस्तान मधील इतर आत्यंतिक महत्त्वाच्या बौद्ध स्थळांची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. ही स्थळे केवळ बौद्ध धर्मीयांच्या साठी महत्त्वाची नसून संपूर्ण मानवी इतिहासासाठी व प्राचीनतम रेशीम मार्गावरील हीच महत्त्वाची बौद्ध स्थळे जपणूक होणे आवश्यक आहे. तालिबान्यांचा मागील कार्यकाल पाहता उरलीसुरली बौद्ध ऐतिहासिक स्थळे नष्ट होण्याची भीती असल्यामुळे वेळीच संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या युनिसेफ या संघटनेच्या माध्यमातून आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैनिकाच्या सहकार्याने बौद्ध परिसराची सुरक्षा करावी अशी मागणी दीपक कदम यांनी युनिसेफच्या प्रमुखाकडे केली आहे. भारत सरकारने सुद्धा या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्धांच्या या इतिहासिक स्थळांचे सुरक्षितता कशा प्रकारे केली जाईल.(Afghanistan Crisis)

संयुक्त राष्ट्र संघाकडे अशा प्रकारची मागणी तात्काळ करावी अशी विनंती दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन/युनिवर्सल बुद्धिस्ट संघ यांनी केली आहे