विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर केलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली
Afghanistan Crisis

विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर केलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर केलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काही लोक विमानाच्या चाकांना आणि पंख्यांना लटकलेले देखील दिसून आले. ज्या विमानात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्या विमानातील आतले फोटो बाहेर आले आहेत. अमेरिकन सैन्याच्या कार्गो विमानामध्ये तब्बल 640 लोक दाटीवाटीनं बसले असल्याचं समोर आलंय.(Afghanistan Crisis)

रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. तालिबानच्या जुलमी राजवटीत जाण्याऐवजी लोक देशातून बाहेर पडण्यास पसंती देत आहेत.अमेरिकन संरक्षण आणि सुरक्षा न्यूज वेबसाईट डिफेन्स वननं अमेरिकेच्या कार्गो विमानातील फोटो प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या सी-17 ग्लोबमास्टरमध्ये जवळपास 640 अफगाणिस्तानचे नागरिक एकमेकांना चिकटून बसलेले पाहायला मिळाले. आतापर्यंत या विमानातून इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिक विमानात बसले होते. फोटोमध्ये अफगाणी नागरिक आणि महिला देखील दिसत आहेत.

त्या लोकांना काबूलमधून कतारला आणलं गेलं. काही लोक विमानाच्या रॅम्पमधून आत घुसले होते.तालिनाबानच्या भीतीनं अफगाणी नागरिक अस्वस्थ झाल्याचं रविवारी आणि सोमवारी काबूल विमानतळावरील गर्दीतून दिसून आलं. देश सोडून जाणाऱ्या अफगाण नागरिकांची अस्वस्थता काबूल विमानतळावर दिसून आली. अनेक लोक लष्करी विमानांच्यावर चढताना दिसले. एका लष्करी विमानाला तीन लोक लटकलेले होते. ते विमान हवेत झेपावल्यानंतर आकाशातून खाली पडून तिघांचा मृत्यू झाला.तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला असला तरी काबूल विमानतळ आणि हवाई वाहतूक नियंत्रण अमेरिकेच्या ताब्यात आहे.(Afghanistan Crisis)

सोमवारी देश सोडून जाणाऱ्या अफगाण नागरिकांनी काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी केल्यानं बंद करण्यात आलेलं अफगाणिस्तानचं काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा सुरु करण्यात आलंय.