अफगाणिस्तानमध्ये 3 लाख कोटी डॉलरचा खजाना

अफगाणिस्तानमध्ये एक खजाना आहे. या खजान्याची किंमत अमेरिकेच्या अभ्यासानुसार तब्बल 3 लाख कोटी डॉलर आहे, तर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे याच्याही तीनपट हा खजाना आहे.

अफगाणिस्तानमध्ये 3 लाख कोटी डॉलरचा खजाना
Afghanistan Crisis

अफगाणिस्तानमध्ये 3 लाख कोटी डॉलरचा खजाना

अफगाणिस्तानमध्ये एक खजाना आहे. या खजान्याची किंमत अमेरिकेच्या अभ्यासानुसार तब्बल 3 लाख कोटी डॉलर आहे, तर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे याच्याही तीनपट हा खजाना आहे.

मागील अनेक दशकांपासून युद्धांमुळे अफगाणिस्‍तानमधील हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. ब्रिटिशांपासून सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेपर्यंत अनेक महासत्तांनी अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य उतरवलं, तर पाकिस्तान, चीनसह अनेक देश इतरांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन अफगाणमधील परिस्थितीचा फायदा घेत आहेत. मात्र, या सर्वांच्या या प्रयत्नांमागे अफगाणिस्तानमधील एक खजाना असल्याची चर्चा आहे.(Afghanistan Crisis)

या खजान्याची किंमत अमेरिकेच्या अभ्यासानुसार तब्बल 3 लाख कोटी डॉलर आहे, तर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे याच्याही तीनपट हा खजाना आहे. हा खजाना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या देशातील खनिज संपत्ती आहे.युद्धांमुळे अफगाणमधील नागरिकांना कमालीच्या गरिबीत जगावं लागतंय. यामुळे हा देश गरीब देश असल्याचा भास होतो मात्र, परिस्थिती त्याच्या उलट आहे. हा देश दक्षिण आशियातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे अब्जावधींची खनिज संपत्ती आहे. ही संपत्ती मिळवण्यासाठी येथे अनेक युद्ध झालेत. म्हणूनच रशिया, अमेरिकासारखे महासत्ता देश अनेक वर्षे अफगाणिस्तानच्या भूमीत ठाण मांडून होते.


अफगाणिस्तानमधील सध्याच्या खनिज संपत्तीचा सर्वात आधी शोध सोव्हिएत संघाने लावला. 1980 च्या दशकात सोव्हिएतने या शोधाला सुरुवात केली. 1989 मध्ये सोव्हिएत संघाचं पतन झाल्यानंतर हा कार्यक्रम थांबला. यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांनी हा सर्वे, मॅप काबुलमधील अफगाण जिओलॉजिकल सर्वेच्या लायब्ररीत जमा केला.2006 मध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या नकाशांचा शोध घेतला आणि पुन्हा शोधमोहिम सुरू केली. अनेक एअरक्राफ्ट इक्विपमेंट्सचा उपयोग करुन केलेल्या अमेरिकेच्या सर्वेत अफगाणमध्ये जवळपास 3 ट्रिलियन डॉलरची खनिज संपत्ती असल्याचं उघड झालं. काही लोकांच्या मते तर वास्तवातील खनिज संपत्ती अमेरिकेच्या अंदाजापेक्षा तीनपट आहे.

2020 मध्ये अफगाणिस्‍तानची अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि अमेरिकेत अफगाणिस्‍तानचे माजी राजदुत अहमद शाह कतवाजाई यांनी एक अभ्यास लेख प्रकाशित केला.यात कतवाजाई यांनी अफगाणमधील खनिज संपत्तीची एकूण किंमत 3 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं.वैज्ञानिकांच्या मते अफगाणिस्तानमध्ये लोह, तांबे, कोबाल्ट, सोने आणि लिथियमच्या मोठ्या खाणी आहेत. अफगाणिस्तानमध्ये 60 मिलियन मेट्रिक टन तांबे, 2.2 बिलियन टन लोह, 1.4 मिलियन टन सेरियम, नियोडिमियम आणि एल्युमिनियम, सोने, चांदी, जस्त, पारा आणि लिथियम सारख्या दुर्मिळ धातूंच्या खाणी आहेत. सध्या हे दुर्मिळ धातू आधुनिक तंत्रज्ञानासाठी खूप महत्त्वाचे आहेत.(Afghanistan Crisis)

याचा उपयोग करुनच मोबाईल फोन, टीव्ही, हायब्रिड इंजिन, कंम्प्यूटर, लेझर आणि बॅटरी तयार केली जाते.