अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय

पाकिस्तानने तालिबानला आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत.

अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय
Afghanistan Crisis

अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय

पाकिस्तानने तालिबानला  आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत.

अफगाणिस्तानात अफरातफरी माजली असताना, पाकिस्तानने या देशाला बुडवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. पाकिस्तानने तालिबानला आधीपासूनच मदत केल्याचे पुरावे समोर आले होते. आता तर पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात तैनात झाल्या आहेत. तालिबानने सत्तेचा दावा केल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादी आता तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात करत आहेत. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात घुसून, काही भागात सामान्य जनतेची लुटालूट करत आहे.इतकंच नाही तर जैश-ए-मोहम्मद  आणि लष्कर ए तैयबाने काबूलसह अनेक ठिकाणी आपआपले चेक पोस्ट उभे केले आहेत.(Afghanistan Crisis)

जिहादच्या नावे जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं जात आहे.मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तालिबानने राष्ट्रपती भवनचा ताबा घेतल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या अफगाणिस्तानात सक्रिय झाल्या.अफगाण सरकारमध्ये सिराजुद्दीन हक्कानीचा  समावेश व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा उपनेता आणि वॉन्टेड घोषित दहशतवादी आहे. त्याच्यावर काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. यामध्ये एका अमेरिकी नागरिकासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर 2008 मध्ये माजी राष्ट्रपती हमीद करझई  यांच्यावर हल्ला करण्याच्या कटातही त्याचा समावेश होता.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळात जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी धाडतो. यानंतर हा नागरिकही भिंतीवरुन खाली पडतो.

पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ आहे विद्यार्थी आता तुम्ही म्हणाल, इतका चांगला अर्थ मग कामं इतकी जिहादी का? तर कट्टर धार्मिक मदरशातून तालिबान उभा राहिलाय, त्यामुळे हे कसे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सौदी अरेबियाने अफगाणिस्तानात असे मदरसे पोसले, ज्यात सुन्नी कट्टर इस्लामिक विचारधारेचा प्रचार केला जायचा. आधीच्या मुजाहिदीन जिहाद्यांमधीलच हा एक गट.(Afghanistan Crisis)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील पश्तून भागात हा गट चांगलाच पोसला. ज्याला पाकिस्तानकडूनही चांगलीच मदत मिळाली