अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत.

अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही
Afghanistan Crisis

अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये राजधानी काबूलचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होईल.नव्या राजवटीची सुरुवात करताना तालिबानच्या मार्गात एक अडथळा निर्माण झाला आहे.(Afghanistan Crisis)

भविष्यात इतर देशांशी व्यवहार करण्यासाठी तालिबानकडे परकीय चलनच उपलब्ध नाही. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) तालिबानला कर्ज देण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत.अफगाणिस्तानातील सत्ताबदलानंतर IMF ने वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे.अन्य देशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर तालिबानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका IMF ने घेतली आहे.

तालिबानकडे सध्याच्या घडीला इतर देशांशी व्यवहार करण्यासाठीचे परकीय चलन उपलब्ध नाही. अफगाणिस्तानातील मध्यवर्ती बँकेकडे 9 अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा आहे. मात्र, हा साठा परदेशात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानकडे रोकड स्वरुपात परकीय चलन उपलब्ध नाही, अशी माहिती अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनी दिली.अफगाणिस्तानच्या मालकीच्या परकीय चलन भांडारात अमेरिकच्या फेडरल बँकेचे 7 अब्ज डॉलर्सचे रोखे, सोने आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे.(Afghanistan Crisis)

परकीय चलनाचा साठा नसल्यास अफगाणिस्तानच्या चलनाचे मूल्य घसरेल आणि देशात महागाई वाढेल. गरीब नागरिकांना याचा मोठा फटका बसेल.