अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड घोषित केलेल्या दहशतवाद्याचं काबुलच्या रस्त्यावर जोरदार स्वागत

अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलेल्या एका दहशतवाद्याच तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये खुलेआम रस्त्यावर जोरदार स्वागत होत असल्याचं समोर आलंय.

अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड घोषित केलेल्या दहशतवाद्याचं काबुलच्या रस्त्यावर जोरदार स्वागत
Afghanistan Crisis

अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलेल्या एका दहशतवाद्याच तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये खुलेआम रस्त्यावर जोरदार स्वागत होत असल्याचं समोर आलंय. खलील हक्कानी असं या दहशतवाद्याचं नाव आहे. तो अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये खुलेआम फिरताना दिसत आहे. येथे लोक त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करताना दिसत आहे. तालिबान्यांसाठी पैसा गोळा करणारा हक्कानी दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंधित आहे. त्याच्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षीस आहे. तो काबुलच्या एका मोठ्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आला तेव्हा लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली.(Afghanistan Crisis)

आता अफगाणिस्तानमध्येआलेल्या तालिबान सरकारमध्ये हक्कानी देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तो मशिदीत गेला तेव्हा त्याच्यासोबत बॉडीगार्डही होते. डेली मेलने न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताचा आधार घेत याबाबत वृत्त दिलंय. हक्कानी उपस्थितांना म्हणाला, “अफगाणिस्तानसाठी आमची पहिलं प्राधान्य सुरक्षा आहे. जर सुरक्षा नसेल तर जीवनही नसेल. आम्ही आधी पुरुष आणि महिलांना सुरक्षा देऊ आणि मग अर्थव्यवस्था, व्यापार आणि शिक्षणावर भर देऊ. कुणासोबतही भेदभाव होणार नाही.”

हक्कानी नेटवर्कची स्थापना 1970 च्या दशकात जलालुद्दीन हक्कानीने केली होती. त्याच्यावर 2001 मध्ये तोरा बोरामधून (Tora Bora) ओसामा बिन लादेनला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. खलील हक्कानी जलालुद्दीनचा भाऊ आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांना पैसा उपलब्ध करुन देण्यासाठी काम करतात.(Afghanistan Crisis)

खलील हक्कानी तालिबानचा डेप्युटी लिडर सिराजुद्दीन हक्कानीचा चुलता आहे. हे दोघेही अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रासह इतर दहशतवादी संघटनांच्या यातीत आहेत.