अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मुरबाड तालुका कार्यकारिणी जाहीर

मुरबाड शहरातील ज्ञानसागर वाचनालय,देवीची आळी मुरबाड येथे झालेल्या सभेत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुरबाड तालुका शाखेची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मुरबाड तालुका  कार्यकारिणी जाहीर
All India Superstition Elimination Committee

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मुरबाड तालुका  कार्यकारिणी जाहीर

मुरबाड शहरातील ज्ञानसागर वाचनालय,देवीची आळी मुरबाड येथे झालेल्या सभेत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुरबाड तालुका शाखेची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

 मुरबाड शहरातील ज्ञानसागर वाचनालय,देवीची आळी मुरबाड येथे झालेल्या सभेत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुरबाड तालुका शाखेची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.यावेळी अभाअंनिसचे मुंबई विभाग सचिव अजित पाध्ये,ठाणे जिल्हा महिला संघटिका नीता डुबे,सल्लागार संदीप पवार,सहसचिव चेतन दावेदार यांनी तालुका कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.(All India Superstition Elimination Committee)

सदर बैठकीत नीता डुबे यांनी मार्गदर्शन करताना आमचा देवा-धर्माला विरोध नाही,हा लढा देवा-धर्माच्या नावाखाली सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या व लुबाडणाऱ्या विरुद्ध आहे,अशी समितीची भूमिका स्पष्ट केली.समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,चिकित्सक वृत्ती जोपासण्यासाठी आयोजित करावयाच्या उपक्रमांसंदर्भात अजित पाध्ये व संदीप पवार यांनी तालुका पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तालुका-गाव पातळीवर अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी हाती घ्यावयाच्या विविध उपक्रमांची या बैठकीत चर्चा करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा नरबळी व जादूटोणा विरोधी कायदा(2013)बाबत स्थानिक पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण घेणे, नागरिक,शिक्षक,युवक-युवती,विद्यार्थी यासाठी शाळा-कॉलेजेस मध्ये चमत्कारामागील विज्ञान स्पष्ट करणारी प्रात्यक्षिके व व्याख्याने आयोजित करणे असे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी तालुका कार्यकारिणीने दिली.अंधश्रध्दा व त्यांच्या निर्मूलनाबाबत झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले वैयक्तिक अनुभव व विचार मांडले.
या सभेत मुरबाड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


शिवाजी तुंगार-अध्यक्ष,
रावसाहेब खेडकर-उपाध्यक्ष,
दादाजी यशवंतराव-संघटक,
यशवंत माळी-सचिव,
विनोद कोर-कोषाध्यक्ष,दिलीप पवार -प्रसिद्धी प्रमुख 
नलिनी इसामे-महिला संघटिका,
विलास ठाकरे,चिंतामण शेलवले- सदस्य, 
मयुरेश शिंदे-युवा संघटक
शांताराम वामन इसामे-सल्लागार
अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
 तसेच यावेळी जळता कापूर खाणे, पेटलेला टेंभा अंगावरून फिरवणे,तांब्यात भूत गाडणे ही प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील विज्ञान स्पष्ट करण्यात आले.
  या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत दादाजी यशवंतराव यांनी तर आभारप्रदर्शन विनोद कोर यांनी केले.(All India Superstition Elimination Committee)