एकनाथ खडसे यांच्यासोबत लवकरच भाजपचा मोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार.?

भाजपचे ज्येष्ठ पण नाराज असलेले नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित मानले जात आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत लवकरच भाजपचा मोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार.?
Along with Eknath Khadse, a large section of the BJP will soon join the NCP?

एकनाथ खडसे यांच्यासोबत लवकरच भाजपचा मोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार.?

भाजपचे ज्येष्ठ पण नाराज असलेले नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीकडून खडसेंना सन्मानाची जागा देण्याची तयारीही सुरु असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंना भेटले. खडसे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हसत स्वागत केलं. 'साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या', अशी विनंती या कार्यकर्त्यांनी खडसेंना केल  आहे.

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय.त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील खडसेंचे चाहते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुक्ताईनगरला येऊन त्यांची भेट घेत आहेत.

बारामती

प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास

___________

Also see : सांगलीमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अत्याचार प्रकरणी रॅली संपन्न.....

https://www.theganimikava.com/The-rally-was-held-in-Sangli-through-Bahujan-Kranti-Morcha