लैंगिक अत्याचाराच्या घटनेत कलमवाढ करण्याची मागणी

एका अनुसुचित जातीच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून फिरायला जाण्याच्या बहाण्याने हाजीमलंग येथे नेऊन तिच्यावर तिचे संमती विना जबरदस्ती करुन लैंगिक अत्याचार करण्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे.

लैंगिक अत्याचाराच्या घटनेत कलमवाढ करण्याची मागणी
Ambernath Crime News

लैंगिक अत्याचाराच्या घटनेत कलमवाढ करण्याची मागणी

एका अनुसुचित जातीच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून फिरायला जाण्याच्या बहाण्याने हाजीमलंग येथे नेऊन तिच्यावर तिचे संमती विना जबरदस्ती करुन लैंगिक अत्याचार करण्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे.

प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

एका अनुसुचित जातीच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून फिरायला जाण्याच्या बहाण्याने हाजीमलंग येथे नेऊन तिच्यावर तिचे संमती विना जबरदस्ती करुन लैंगिक अत्याचार करण्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे. याबाबतची माहिती अन्याय अत्याचार निर्मुलन समिती अंबरनाथ शहर अध्यक्षा गायत्री चव्हाण यांना पिडीत मुलीच्या आईने दिल्याने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा पोक्सोसह भादवि.संहितेचे कलमांतर्गत नोंदविण्यात आलेला असुन आरोपी इसमास पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे.(Ambernath Crime News)


सदर पिडीत मुलगी ही अनुसुचित जातीची आहे तिचेवर अत्याचार करणारा आरोपी हा अत्याचारीत मुलीला ओळखतो आणि तो गैर अनुसूचित जातीचा असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.सदर प्रकरणाचे सत्यशोधन केले असता नमुद गुन्ह्यात अनुसूचित जाती अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(यु), ३(१) (डब्ल्यू) (१), ३(१) (डब्ल्यू (२), ३(२)(पाच-ए) इत्यादी कलमवाढ सदर गुन्ह्यात करण्याची मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांचेकडे प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चेद्वारे केली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे संमतीने व अण्णा पंडित यांच्या नेतृत्वाखाली भेटीस गेलेल्या शिष्टमंडळामध्ये अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे, तालुका सचिव निर्मला गहलोत, शहर अध्यक्षा गायत्री चव्हाण कल्याण तालुक्यातील प्रशांत जाधव इत्यादींसह पिडीत मुलीची आई उपस्थित होती, पुरवणी जबाब घेऊन कलमवाढ करण्याचे आश्वासन वपोनी मधुकर भोगे यांनी शिष्टमंडळास दिले आहे.(Ambernath Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/