लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य

विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते.

लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य
Amravati Crime News

लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य

विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते.

लष्कारात सैन्यात भरती व्हावं. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या दुष्मनांच्या नांग्या ठेचाव्यात. सैनिक बनून देशासाठी काहितरी चांगली कामगिरी करुन दाखवावी, असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण काही व्यक्तींना चांगल्या पदाची, नोकरीची किंमत नसते. त्यांना आपल्या जबाबादारीची जाणीव नसते. ते चांगलं काही करत तर नाहीच पण इतरांना त्रास होईल, असं वागतात. त्यामुळे अशा इसमांना अद्दल घडवणं हाच योग्य पर्याय. अमरावतीत देखील असाच एक नराधम पोलिसांनी पकडला आहे. हा नराधम सैन्यात आहे. पण तरीही त्याने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे.(Amravati Crime News)

संबंधित आरोपी हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहे.तो काश्मीरला पोस्टिंगला असतो. पण काही कारणास्तव तो विदर्भात त्याच्या गावी जसापूर येथे आला आहे. तो दारुच्या नशेत इतर दोन जोडीदारांना सोबत घेऊन मडकी गावाजवळ पर्यटकांना लुटताना रंगेहात पकडला गेला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी हा सैन्यात असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे ही माहिती खरी आहे का? याची शाहनिशा पोलिसांनी केली.

पोलिसांना जेव्हा खरं माहिती पडलं तेव्हा ते देखील चक्रावून गेले. कारण आरोपी खरंच सैन्यात कार्यरत आहे.विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते. आरोपी पर्यटकांना दमदाटी देऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. चिखलदराकडे जाताना चांदूरबाजार तहसील हद्दीत जसापूर गाव आहे. याच गावाचे ते तीन तरुण आहेत. यातील एक तरुण हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. पण तो आपल्या सहकाऱ्यांसह गावाजवळ दारुच्या नशेत मडकी गावाजवळ येणाऱ्या पर्यटकांना लुटत होता.

त्याने अनेक पर्यटकांची वाहने थांबवली. त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुलीही केली.अखेर आरोपींच्या या कृत्याची माहिती पोलिसांना लागली. एका पर्यटकाने आरोपींच्या या कृत्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारदाराच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे आरोपींमधील एक तरुण हा लष्करात आहे. त्याच्या या कृत्याने आमरावतीकरांना देखील वाईट वाटलं आहे.(Amravati Crime News)

त्यामुळे त्याच्या या कृत्यावरुन अमरावतीकर माफ करतील का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.