सफाळ्यात दिव्यांगांचा स्नेहमेळावा खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत संपन्न

पालघर तालुक्यातील सफाळे वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (तारीख 4) सफाळे नारोडा येथे दिव्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.

सफाळ्यात दिव्यांगांचा स्नेहमेळावा खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत संपन्न
Andh Apang Sevabhavi Sanstha

सफाळ्यात दिव्यांगांचा स्नेहमेळावा खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत संपन्न

पालघर तालुक्यातील सफाळे  वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (तारीख 4) सफाळे नारोडा येथे दिव्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.

रविंद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील सफाळे  वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (तारीख 4) सफाळे नारोडा येथे दिव्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यात परिसरातील शेकडो दिव्यांग व्यक्ती सामील झाले होते.(Andh Apang Sevabhavi Sanstha)


   या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पालघरचे खासदार गावित यांनी समाजातील कला संपन्न असलेला दिव्यांग हा अजूनही एक दुर्लक्षित असलेला घटक असून दिव्यांगांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रथमतः स्वावलंबी बनवणे अत्यंत आवश्यक आहे.


 वंदे मातरम संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना स्वयमरोजगार उपलब्ध करून दिला जात आहे  हे निश्चितच भूषणावह असून दिव्यांगांना त्यांच्या अंगी असलेल्या कलेचा योग्य तो वापर करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देऊन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू असून लवकरच पालघर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिबिर घेऊन वाटप करण्यात येतील असेही  सांगितले. संस्थेच्या वतीने वंदे मातरम अगरबत्ती ची जास्तीत जास्त विक्री कसे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खासदार गावित यांनी सांगितले.


      या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत होते. राऊत यांनी संस्थेचे पालघर जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक दिव्यांग सभासद असून सफाळे येथील एका पडक्या इमारतीत संस्थेचे स्वयंरोजगाराचे कामकाज सुरू असून अनेक निराधार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत. मात्र शासनाने स्वयंरोजगारासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून दिल्यास स्वयंरोजगाराची व्याप्ती वाढवता येईल असे सांगितले.


      यावेळी सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पालघर येथील कांता हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र चव्हाण, नेत्र चिकित्सक डॉ. गीता राजू, विधाता ग्राफिक्स चे मालक सुरेश सावला, दातिवरे येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले.


         या दिव्यांग स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेचे सल्लागार प्रमोद पाटील यांनी केले तर महेंद्र पाटील यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. गीतेशी तरे यांनी मधुर आवाजामध्ये मान्यवरांचे स्वागत केले.


      यावेळी व्यासपीठावर वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या सचिव निता तामोरे, सल्लागार राजन घरत, खजिनदार प्रियांका कुडू, रोहित गावित, मोईन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. विरार येथील विवा कॉलेजच्या एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली.या स्नेहमेळाव्यामध्ये दिव्यांगाना मिठाई आणि फराळाचे साहित्य देण्यात आले.(Andh Apang Sevabhavi Sanstha)