सुभेदार रामजी बाबा,क्रांतिवीर लहुजी साळवे व बिरसा मुंडा यांची जयंती उत्‍साहात संपन्‍न

बीड  पारतंत्र्यात वंचित समाज न्यायहक्कासाठी,अत्याचाराविरुद्ध लढला हे ध्यानात ठेवून आजच्या काळातही महापुरुषांच्या जयंतीदिनी संघटित होणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही.बनसोडे यांनी प्रतिपादन केले. 

सुभेदार रामजी बाबा,क्रांतिवीर लहुजी साळवे व बिरसा मुंडा यांची जयंती उत्‍साहात संपन्‍न
Anniversary celebrations

सुभेदार रामजी बाबा,क्रांतिवीर लहुजी साळवे व बिरसा मुंडा यांची जयंती उत्‍साहात संपन्‍न

बीड  पारतंत्र्यात वंचित समाज न्यायहक्कासाठी,अत्याचाराविरुद्ध लढला हे ध्यानात ठेवून आजच्या काळातही महापुरुषांच्या जयंतीदिनी संघटित होणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही.बनसोडे यांनी प्रतिपादन केले. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 बीड  पारतंत्र्यात वंचित समाज न्यायहक्कासाठी,अत्याचाराविरुद्ध लढला हे ध्यानात ठेवून आजच्या काळातही महापुरुषांच्या जयंतीदिनी संघटित होणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही.बनसोडे यांनी प्रतिपादन केले. से.नि. बहुजन अधिकारी - कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा बीड यांनी सुभेदार रामजी बाबा, क्रांतिवीर लहुजी साळवे व बिरसा मुंडा यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित केला होता.(Anniversary celebrations)

सर्वप्रथम महापुरुषांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून  अभिवादन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सखाराम उजगरे, चंपावतीचे भुतपल्ले सर व पंडित चव्हान प्रमुख पाव्हुणे होते. अध्यक्षपदावरून बोलताना पी. व्ही. बनसोडे पूढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर देखील एस.सी., एस.टी. व वंचित घटकांना त्यांचे घटनादत्त अधिकार कसे मिळतील व घटनेनुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित समाज कसा तयार होईल याकरिता सनदशीर मार्गाचा अवलंब करून एकत्रित येऊन संघर्ष कसा करता येईल हे अशा महापुरुषांच्या जयंती किंवा स्मृतिदिनी त्यांच्या कार्याला उजाळा देऊन डॉ. बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" या अनमोल मूलमंत्राची सतत आठवण ठेवून त्याप्रमाणे प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. उपासक सखाराम उजगरे म्हणाले की, सेवानिवृत्तांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याकरता उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या सोडविण्यास कटिबद्ध असणे जरुरीचे आहे. तर भुतपल्ले सर महापुरुषांना अभिवादन प्रसंगी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या तथागतांच्या पंचशीलाचे पालन करूनच आपण सर्वजण जीवनात यश प्राप्त करू शकतो.  करूणा, मैत्रीभाव निर्माण करता येईल, हे पक्के लक्षात ठेवावे.


सेवानिवृत्तांनी दान पारमितेची जाण ठेवून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वीर माता जिजाऊ, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांचे जीवन चरित्र पुस्तके व भारतीय घटना, बुद्ध व त्यांचा धम्म अशा एकूण तीस पुस्तके महामानव वाचनालयाला लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास सेवानिवृत्त तहसीलदार अनंतराव सरवदे, प्रा.डाँ. उत्तमराव साळवे, प्रा. अशोक गायकवाड, वावळकर एस. जी. सिंनगारे  तानाजी, दळवी बी. जी. सुधाकर विद्यागर, काशीनाथ वाघमारे, प्रदीप घाडगे, डॉ. किसनराव साळवे, सुनील जाधव, मस्के एस. बी., आर. इ. निकाळजे, आर.एम, शेवाळे आर. एन.,  वंदनाताई वाघमारे, आशाताई विद्यागर, निर्मळ संदिपान व बहुसंख्य सेवानिवृत्त बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कँप्टन राजाभाऊ आठवले यांनी तर सूत्रसंचालन गुलाब भोले यांनी केले व आभार डी. जी. वानखडे यांनी मानले.(Anniversary celebrations)