सामाईक प्रवेश परीक्षांचे (CET) सुधारित वेळापत्रक जाहीर...
लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक "सीईटी सेल'ने मंगळवारी जाहीर केले आहे...

सामाईक प्रवेश परीक्षांचे
(CET) सुधारित वेळापत्रक जाहीर...
पुणे (pune) : लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक "सीईटी सेल'ने आज (मंगळवारी) जाहीर केले आहे. यामध्ये तंत्रशिक्षणाच्या चार आणि उच्च शिक्षण विभागाच्या आठ परीक्षांचा समावेश आहे. तीन ऑक्टोबरपासून सीईटीची परीक्षा (CET exam) सुरू होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षा (CET exam) सुरक्षित नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतची माहिती हॉल तिकिटावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील सुरक्षित नियमांची माहिती देखील हॉल तिकिटावर प्रकाशित करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तीन वर्षीय एलएलबी (LLB) आणि बीएड (B.Ed.) या अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे "सीईटी सेल'ने स्पष्ट केले आहे. प्रवेश परीक्षांची अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा (CET exam) अभ्यासक्रम : सीईटी परीक्षा दिनांक
एमपीएड (MPED) - 3 ऑक्टोबर
एमएड (M.Ed.) - 3 ऑक्टोबर
बीएड/एमएड सीईटी (B.Ed / M.Ed CET) - 10 ऑक्टोबर
एलएलबी (LLB) ( पाच वर्षे) - 11 ऑक्टोबर
बीपीएड (B.P.Ed.) - 11 ऑक्टोबर
बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड (BA / BSc BEd Integrated)- 11 ऑक्टोबर
तंत्रशिक्षण (Technical education) विभागाच्या सीईटी (CET) अभ्यासक्रम - सीईटी परीक्षा दिनांक
एम-आर्च सीईटी (M-Arch CET) - 3 ऑक्टोबर
एम- एचएमसीटी (M-HMCT) - 3 ऑक्टोबर
एमसीए (MCA) - 10 ऑक्टोबर
बी-एचएमसीटी (BHMCT) - 10 ऑक्टोबर
पिंपरी , पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
_______
Also see : ऐस क्लासेसचा... पहिल्याच वर्षी दणदणीत निकाल.
https://www.theganimikava.com/Ace-classes-sounded-the-first-year