पालघर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीस  पदी अंजली कुडू यांची नियुक्ती

सफाळे येथील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या अंजली अनंत कुडू यांची  पालघर जिल्हा सरचिटणीस पदी   जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली...

पालघर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीस  पदी अंजली कुडू यांची नियुक्ती
Appointment of Anjali Kudu as General Secretary of Palghar District BJP

पालघर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीस  पदी अंजली कुडू यांची नियुक्ती

सफाळे येथील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या अंजली अनंत कुडू यांची  पालघर जिल्हा सरचिटणीस पदी   जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.

अंजली कुडू पालघर -ठाणे जिल्हा विभागीय महिला मोर्चा उपाध्यक्ष  या  पदावर असताना केलेल्या अनेक उल्लेखनीय उपक्रमाची आणि सातत्याने सक्रिय राहून नेतृत्व बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या असुन केलेल्या कार्याचा दखल घेऊन त्यांची भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली. पालघर जिल्हा भाजपाध्यक्ष यांच्या हस्ते णत्यांना या पदाची जबाबदारी सोपवत  नियुक्तीपत्र देण्यात आले.
  सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन  त्यांनी केले आहे.त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले . त्यांचे नियुक्तीबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

हा  नियुक्तीपत्र चा कार्यक्रम चहाडे  झाला असून ही नवीन जबाबदारी माझ्यावर नव्या कार्याची प्रेरणा ठरली आहे.  निवडी बद्दल बोलताना  अंजली कडू यांनी सांगितले की जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता येणाऱ्या काळात पालघर जिल्ह्यात  जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून  पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करीत राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्या  समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या नात्याने त्या  नेहमीच समाजातील  गरजू लोकांना मदत करत असतात. पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबुतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल असे मत अंजली कुडू यांनी  व्यक्त केले.   यावेळी सरचिटणीस संतोष जनाठे, सुशील औसरकर, कोषाध्यक्ष सुमिती जैन, जिल्हा परिषद सदस्य अनुश्री पाटील  व जिल्ह्याचे  पदाधिकारी , कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सफाळे पालघर 
प्रतिनिधी - रविंद्र घरत

_________

Also see :  नाळवंडी नाका येथे रस्त्यासाठी मड-गाडो आंदोलन करणार- संदीप जाधव, बीड

https://www.theganimikava.com/beed-mud-gado-agitation-for-road-at-nalwandi-naka