अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल
Aruna Bhatiya News

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर, आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून मुंबईला परतला आहे. अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता.अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. तब्येत बरी नसल्याने त्याने आईसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी तो लगेच भारतात परतला आहे.(Aruna Bhatiya News)


अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमीटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.नुकतीच चित्रपटगृहे उघडल्यानंतर अक्षय कुमारने आपला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षयचा अभिनय आणि लूक चित्रपटात चांगलाच गाजला आहे.

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले.

अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.त्याच वेळी, केरळमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, परंतु हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचा एक मोठा भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. तसे, ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याने यापूर्वी ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे.(Aruna Bhatiya News)

याशिवाय त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट आहेत.