जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अरविंद शाळेचे माजी विधार्थी आले एकत्र

आज ठरल्याप्रमाणे जोगेश्वरी गुंफा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी अरविंद गंडभीर हायस्कूल जोगेश्वरी पूर्व येथील माजी विधार्थी एकत्र आले होते. सकाळी ठीक १०.०० वा दर्शनासाठी रांगेत उभे होतो.

जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अरविंद शाळेचे माजी विधार्थी आले एकत्र
Arvind Gandbhir High School

जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अरविंद शाळेचे माजी विधार्थी आले एकत्र

आज ठरल्याप्रमाणे जोगेश्वरी गुंफा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी अरविंद गंडभीर हायस्कूल जोगेश्वरी पूर्व येथील माजी विधार्थी एकत्र आले होते. सकाळी ठीक १०.०० वा दर्शनासाठी रांगेत उभे होतो.

मुंबई-गणेश हिरवे:

आज ठरल्याप्रमाणे जोगेश्वरी गुंफा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी अरविंद गंडभीर हायस्कूल जोगेश्वरी पूर्व येथील माजी विधार्थी एकत्र आले होते. सकाळी ठीक १०.०० वा दर्शनासाठी रांगेत उभे होतो.आज पंचमी असल्याने दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी होती.तरीही साधारण अर्ध्या तासात दर्शन झाले.(Arvind Gandbhir High School)

आज बऱ्याच महिन्यांनी सर्वजण एकत्र आल्याने एकमेकांशी गप्पाटप्पा,विचारपूस झाली.थोडंस फोटोसेशन झालं व मुळात आज केशरी रंग असल्याने बऱ्यापैकी मित्र-मैत्रिणीनी नारिंगी रंगाचा पेहराव केला होता.किरण सर,बेडेकर सर,प्रसाद घाटे सर असे तिघेही सपत्नीक आले होते.बऱ्याच वर्षांनी आम्हा सर्वांना नवरात्री निमित्ताने गुंफेत जाण्याचा योग आला.पांडवकालीन गुंफा असल्याने हिला विशेष महत्व आहे.सध्या गुंफा आहे तशीच भग्न अवस्थेत असून केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे याचा कार्यभार असल्याने या विभागाकडून लवकरच जोगेश्वरी व इतरही अनेक गुंफा विकास व्हावा अशी मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

शेवटी निघताना घशाला थोडा थंडावा म्हणून किरण साहेबांनी सर्वाना उसाचा रस पाजला तर गणेश हिरवे यांनी उपस्थितांना हसती दुनिया व मास्क भेट दिले.पुन्हा एकदा कधी तरी येन केन प्रकारेण भेटू या असा एकमेकांचा निरोप घेत सर्वजण मार्गस्थ झाले.(Arvind Gandbhir High School)