आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालयात मदत सेवा केंद्र सुरु
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे ब्रीदवाक्य समोर ठेवून बीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने 24 तास मदत केंद्र सेवा चालू करण्यात आले...
आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालयात मदत सेवा केंद्र सुरु
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे ब्रीदवाक्य समोर ठेवून बीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने 24 तास मदत केंद्र सेवा चालू करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत असल्या कोरोणामुळे नागरिक कोव्हीड केअर सेंटर ज्या ठिकाणी आहे आशा जिल्हा रुग्णालयाकडे येण्यास धजत नाहीत. सर्वसामान्य लोक व आलेल्या नविन लोकांना योग्य प्रकारे माहिती मिळत नाही. त्यासाठी ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडून परवानगी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अजय सुरवसे व टीमने उपक्रम चालू केला आहे. 24 तास मदत केंद्र सेवा चालू केली आहे, हक्काने सांगा आम्ही आपली सेवा करायला तयार आहोत. बीड जिल्हा रुग्णालयातील इतर ठिकाणच्या अडचणी तक्रारी संदर्भात मदतीसाठी आपण सर्वांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहोत त्यांनी हेल्पलाईन क्रमांक याठिकाणी दिला आहे. गरजु साठी संपर्क- 9860906849 यावेळी अजय सुरवसे, विजय हजारे, प्रकाश गायकवाड,अमोल शिंदे, विशाल वाघमारे,वैभव सरवदे आदी उपस्थित होते.
अति आवश्यक रुग्णांसाठी रक्त ची व्यवस्था करने,
कोरोणा पेशंट साठी प्लाजमा उपलब्ध करून देणे.
रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देणे.
योग्य सल्ला व मार्गदर्शन पुरवण्याचे काम चालू केले आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : कल्याण पूर्वेत "जिजाऊ सावित्री बाग"
https://www.theganimikava.com/Jijau-Savitri-Bag-in-Kalyan-East