औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली

पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली
Aurangabad Police officers transfer order

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली

 पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

औरंगाबाद पोलीस दलातील 560 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. हवालदार ते सहायक फौजदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यास सुरुवात झाली आहे. पसंतीक्रम दिलेल्या तीन ठिकाणांपैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे. पीएसआयपासून पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वांचा नंबर लागणार असल्याची माहिती आहे.औरंगाबाद पोलीस दलातील 809 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 560 जणांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.(Transfer of 560 personnel of Aurangabad City Police)

तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे बदली आदेश आज निघणार आहेत. शहर पोलीस दलातील हवालदार ते सहाय्यक फौजदारांच्या बदली करण्यास सुरुवात झाली आहे. तीन पसंतीच्या ठिकाणांपैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे.गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

आठ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक लागला आहे. कोव्हिड प्रादुर्भाव, पालिका निवडणुका आणि सण समारंभ यांच्या पार्श्वभूमीवर बदलींचे आदेश सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. जून महिन्याच्या अखेरीस बदलींसाठी मुंबईतील 727 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती.बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्यानतंर आठ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात काढणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती.

शहरातील पोलिस दलात असलेली रिक्त पदे, कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव, सण, महापालिका निवडणुका, गणपती, नवरात्र या पार्श्वभूमीवर पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत या आदेशावर सहा महिन्यानंतर कारवाई करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.शहरामध्ये आठ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची मुंबईबाहेर बदली होणार होती. त्यात नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांचा समावेश होता.(Transfer of 560 personnel of Aurangabad City Police)

मुंबई पोलिसातील संबंधित 727 अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील आपल्या पसंतीच्या तीन जागा निवडण्याचे आदेश देण्यात आले होते.