SBI, ICICI आणि PNB च्या ग्राहकांनो सावधान

आमिषं दाखवणारे अनेक मेल येत असतात, पण अशा मेलनं भुलून जाण्याची गरज नाही. जर आपण असे मेल उघडण्याची चूक केल्यास एका क्लिकवर आपले बँक खाते रिक्त होणार आहे.

SBI, ICICI आणि PNB च्या ग्राहकांनो सावधान
BANK UPDATE

SBI, ICICI आणि PNB च्या ग्राहकांनो सावधान

Warning to customers of SBI, ICICI and PNB

आमिषं दाखवणारे अनेक मेल येत असतात, पण अशा मेलनं भुलून जाण्याची गरज नाही. जर आपण असे मेल उघडण्याची चूक केल्यास एका क्लिकवर आपले बँक खाते रिक्त होणार आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एसबीआय, आयसीआयसीआय आणि पीएनबीने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना सतर्क केलेय. पीएनबीने आपल्या ग्राहकांना फिशिंग ईमेलचा इशारा दिलाय. आमिषं दाखवणारे अनेक मेल येत असतात, पण अशा मेलनं भुलून जाण्याची गरज नाही. जर आपण असे मेल उघडण्याची चूक केल्यास एका क्लिकवर आपले बँक खाते रिक्त होणार आहे.

अशा प्रकारच्या मेल आणि कॉलपासून सावध राहण्याचे बँकेनं ट्विट आणि मेसेज करून ग्राहकांना अलर्ट दिलाय. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात खातेदारांना क्यूआर कोड वापरण्याचे सांगत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय.

फिशिंग ईमेल व्यतिरिक्त बनावट ग्राहक सेवा, केवायसी अद्ययावत या नावावर क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांक मागितला जातो. याशिवाय ओटीपी आणि पासवर्डची मागणी केली जाते. बँकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही परिस्थितीत इंटरनेट बँकिंग लॉगिन तपशील, ओटीपी, पासवर्ड शेअर करू नये, हे ग्राहकांना माहीत असणे आवश्यक आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, क्यूआर कोडच्या मदतीने पेमेंट केले जाते किंवा पेमेंट मिळवले जाते. जेव्हा आपण एखाद्या दुकानात पैसे भरता तेव्हा एकतर तो आपल्याला त्याचा नंबर सांगतो किंवा स्कॅनसाठी आपला क्यूआर कोड देतो. आपण कोड स्कॅन करा आणि पैसे देता.

त्याच वेळी, फसवणूक करणारा आपला क्यूआर कोड शेअर करेल आणि खोटे आश्वासन देईल. ते स्कॅन केल्याने आपल्या खात्यात पैसे येतील, असं सांगितले जाईल. परंतु सत्य हे आहे की, ते स्कॅन केल्यानंतर आपले खाते रिक्त होईल.

आयसीआयसीआय बँकेने ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, बँक कधीही आपली वैयक्तिक माहिती विचारत नाही. बँक आपल्यासोबत सीव्हीव्ही पिन, पासवर्ड, ओटीपी, पिन सारखी माहिती शेअर करत नाही. अशा परिस्थितीत ही माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

जरी फोन आणि एसएमएसद्वारे अशी माहिती मिळविली जात असली तरी ती शेअर केली जात नाही.