सेवा सप्ताहानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णांना फळे वाटप वाटप

मनोर ग्रामीण रुग्णालय, मासवण, दुर्वेस आणि सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता.....

सेवा सप्ताहानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णांना फळे वाटप वाटप
सेवा सप्ताहानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णांना फळे वाटप वाटप

सेवा सप्ताहानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णांना फळे वाटप वाटप

मनोर ग्रामीण रुग्णालय, मासवण, दुर्वेस आणि सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यस्तरावर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा साप्ताहाच्या निमित्ताने बुधवारी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनोर ग्रामीण रुग्णालय, दुर्वेस, मासवण आणि सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वछता केली. तसेच रुग्णालयांत दाखल रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. या स्वच्छता अभियाना अंतर्गत रुग्णालयाच्या परिसरातील कचरा साफ करून स्वच्छ करण्यात आली. हे स्वछता अभियानात भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे, कोषाध्यक्ष सुमती जैन, मंडळ अध्यक्ष संतोषी गिंभल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुश्री पाटील, बबन वझे, किशोर खडके, अंजली कुडू, भारत काळे, प्रितम आंबेकर, अर्चना पाटील, तानाजी घोलप, प्रकाश जैन, हर्षद पाटील आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : पिंपरी  चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ

https://www.theganimikava.com/Increase-in-the-number-of-corona-in-Pimpri-Chinchwad