आठवड्यात 4 दिवस बँका बंद

या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या. कॅलेंडर महिना जसजसा पुढे सरकत गेला, तशा सुट्ट्या आल्या आणि गेल्या. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत.

आठवड्यात 4 दिवस बँका बंद
Bank Holidays

आठवड्यात 4 दिवस बँका बंद

या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या. कॅलेंडर महिना जसजसा पुढे सरकत गेला, तशा सुट्ट्या आल्या आणि गेल्या. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत. 

येत्या काही दिवसांत जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाची काम करणार असाल, तर तुम्ही ती तात्काळ उरका, अन्यथा तुम्हाला बराच काळ थांबावे लागेल. कारण या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2021 महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती.या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या. कॅलेंडर महिना जसजसा पुढे सरकत गेला, तशा सुट्ट्या आल्या आणि गेल्या. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत.(Bank Holidays)

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहतील. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील.आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी जारी करते. RBI ने या आठवड्यात बँकांमध्ये 4 दिवस सुट्टी निश्चित केलीय. ही सुट्टी प्रत्येक राज्यातील बँकांसाठी नाही.

 28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार
29 ऑगस्ट 2021 – रविवार
30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)
31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद)

जन्माष्टमी/कृष्ण जयंती 30 ऑगस्ट 2021 रोजी आहे. या दिवशी अनेक शहरांतील बँका बंद राहतील. या दिवशी अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक या बँकांमध्ये कोणताही व्यवसाय होणार नाही. याशिवाय या महिन्याच्या चौथ्या शनिवारी 28 ऑगस्टला सुट्टी असेल. 29 ऑगस्टला रविवार आहे. यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील.(Bank Holidays)

त्याच वेळी 31 ऑगस्ट 2021 श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे हैदराबादच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.