औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी

औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती.

औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी
Bank Jobs

औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी

औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती.

औरंगाबाद जिल्हा बँकेत लवकरच नव्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या बँकेत मनुष्यबळ कमी असल्याने 200 नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती.(Bank Jobs)

यापूर्वी बँकेत 1250 कर्मचारी होते. मात्र, आता बँकेत केवळ 750 कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने भरती करणे गरजेचे असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी दिली.कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती जाहीर केली आहे. कोल इंडियाच्या नोटिफिकेशनुसार एकूण 588 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडची अधिकृत वेबसाईट coalindia.in ला भेट द्यावी लागेल.

भारत सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बी टेक आणि बीएससी अभियांत्रिकी सारखी अभियांत्रिकी पदवी घेतले उमेदवार अर्ज करु शकतात.कोल इंडिया लिमिटेड ने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार, मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे. पात्र उमेदवार 9 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करु शकतात. अर्जाचं शुल्क देखील 9 सप्टेंबरपर्यंत जमा करता येईल. परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.(Bank Jobs)

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट coalindia.in वरील सूचना वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.