५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात जिल्हाधिका-यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाईन केल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिका- यांवर कारवाई करा

बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० राशनकार्ड गायब प्रकरणात जबाबदार संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात जिल्हाधिका-यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाईन केल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिका- यांवर कारवाई करा
Beed district supply department

५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात जिल्हाधिका-यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाईन केल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिका-यांवर कारवाई करा

बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० राशनकार्ड गायब प्रकरणात जबाबदार संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० राशनकार्ड गायब प्रकरणात जबाबदार संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच स्वस्त धान्य दुकान तांदळवाडी घाट ता.जि.बीड येथील ग्रामस्थांनी पकडलेला टेम्पो संदर्भात गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल तहसिलदार बीड शिरीष वमने व संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी  सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून आदेश देऊन सुद्धा संबधित दोषींवर कारवाई न केल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.(Beed district supply department)बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात जबाबदार संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच स्वस्त धान्य दुकान तांदळवाडी घाट ता.जि.बीड येथील ग्रामस्थांनी पकडलेला टेम्पो संदर्भात गुन्हा दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल तहसिलदार शिरीष वमने यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले होते. 


त्या निवेदनाच्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी बीड यांनी दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांना निवेदनातील प्रकरणात नमुद मुद्यांबाबत दखल घेऊन आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास परस्पर अवगत करावे असे निर्देश दिलेले आहेत परंतु आज दि.१९ नोव्हेंबर २०२१ रोजी महिना होऊन सुद्धा कोणतीही कारवाई न केल्याबद्दल तसेच तक्रारदारास परस्पर कळविण्यात आले नसुन आपल्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.(Beed district supply department)