बेन स्टोक्सच्या निर्णयाने इंग्लंडला मोठा धक्का

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

बेन स्टोक्सच्या निर्णयाने इंग्लंडला मोठा धक्का
Ben Stokes

बेन स्टोक्सच्या निर्णयाने इंग्लंडला मोठा धक्का

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

 क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने  याबाबतची माहिती दिली.(Ben Stokes)

येत्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलंच, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे.

यंदा आयपीएल 2021 दरम्यान स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. कॅच घेताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं.इंग्लंड बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बेन स्टोक्सने भारताविरुद्ध पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी तो घेत आहे. शिवाय त्याच्या बोटालाही दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा आदर करतो.भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे.

17 जणांचा संघ जाहीर केला होता, त्यामध्ये स्टोक्सचा समावेश होता. आता त्याच्या जागी क्रेग ओव्हटरनचा समावेश करण्यात आला आहे.बेन स्टोक्स हा सध्याच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.स्टोक्सने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धअडिलेटमध्ये कसोटी पदार्पण केलं.स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी सामन्यात 10 शतकं ठोकली आहेत.त्याच्या नावावर कसोटीत 4631 धावा आहेत.कसोटीत स्टोक्सने 163 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 4 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.स्टोक्सने 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे पदार्पण केलं होतं, तर त्याच वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध तो टी 20 च्या मैदानात उतरला.वन डेमध्ये त्याने 101 सामन्यात 2871 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतकं आणि 74 विकेट्सही घेतल्या आहेत.2019 मध्ये इंग्लंडने जिंकलेल्या वन डे विश्वचषकात स्टोक्सने जबरदस्त खेळी केली होती.बेन स्टोक्स 34 टी 20 सामने खेळला आहे.(Ben Stokes)

त्याने 19 विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंग करताना 442 धावा ठोकल्या