तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित

तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली ....

तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित
Beneficiaries at Talawali Baragaon deprived of toilet funds
तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित
तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित

तळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित

 मुरबाड तालुक्यातील बारागाव तळवली येथील सात लाभार्थी गेल्या ३-४ वर्षापासून शौचालय निधीपासून वंचित असल्याची तक्रार कुणबी समाज संघटनेचे सरचिटणीस व मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रकाश पवार सर यांनी पंचायत समिती मुरबाडचे सभापती श्रीकांत धुमाळ व गटविकास अधिकारी अवचार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तळावली बारागाव येथील मंगल आण्णा वेखंडे,रघुनाथ धोंडू बांगर, माणिक केशव वेखंडे,शांताराम आण्णा वेखंडे,संदीप मोतीराम वेखंडे,सुनिल शिवराम गायकवाड,तानाजी शिवराम बोराडे,चिंतामण दाजी बोराडे,धनाजी कमळू बोराडे,जगन्नाथ नामदेव बोराडे,राजाराम बाबू बोराडे या लाभार्थ्यांनी गेल्या तीन वर्षापुर्वी ग्राम पंचायत अंतर्गत  'हगणदारी मुक्त गाव' या योजनेतून शौचालयाचे काम केले आहे.सदर लाभार्थी यांनी ग्राम पंचायतीला वेळोवेळी कागद पञांची पुर्तता करुनही आज पर्यंत या योजनेचा १२०००/- रुपया पैकी एक रुपयाही लाभ मिळाला नसल्याचे शिवसेना युवा प्रमुख मेघराज वेखंडे व मोहन बोराडे यांनी प्रकाश पवार सर यांना सांगितले.
यासंबधीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प ठाणे,अध्यक्षा सौ.सुषमा लोणे व उपाध्यक्ष सुभाष पवार यांना देऊन लवकरात लवकर या लाभार्थींना शौचालय निधी मिळावा अशी मागणी पवार यांनी केली आहे

मुरबाड 

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

______

Also see : दिव्यात ठाणे आहे, पण ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही...

https://www.theganimikava.com/There-is-Thane-in-Divya-but-Diva-is-not-seen-in-the-development-of-Thane