25 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स

देशातील ग्राहक आता 5G स्मार्टफोन खरेदी करु लागले आहेत. मात्र 5G फोनसाठी तुम्हाला मोठ्या बजेटची गरज नाही.

25 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स
Best 5G smartphones

25 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स

देशातील ग्राहक आता 5G स्मार्टफोन खरेदी करु लागले आहेत. मात्र 5G फोनसाठी तुम्हाला मोठ्या बजेटची गरज नाही.

देशातील ग्राहक आता 5G स्मार्टफोन खरेदी करु लागले आहेत. 5G फोनसाठी तुम्हाला मोठ्या बजेटची गरज नाही. 5G फोन आता बाजारात मिड-रेंज सेगमेंट मध्येदेखील उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला 25,000 रुपयांच्या आत येणाऱ्या 5G स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत.Samsung Galaxy A22 5G हा कंपनीचा लेटेस्ट 5G स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.(Best 5G smartphones)

Vivo Y72 5G स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. यामध्ये एक पर्याय देण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला 4GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळू शकेल. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. त्याची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे.OnePlus Nord CE 5G या स्मार्टफोनची किंमत देखील 25,000 रुपयांच्या आत आहे. यात 90Hz AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन 30W फास्ट चार्जिंगसह येतो. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. त्याची किंमत 22,999 रुपयांपासून सुरू होते.

जर तुम्हाला 5G सोबत गेमिंग फोन हवा असेल तर तुम्ही IQOO Z3 5G हा पर्याय निवडू शकता. यात तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. हा फोन 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात व्हर्च्युअल रॅम देखील आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. त्याची किंमत 19,990 रुपयांपासून सुरू होते.जर तुम्हाला Realme चा पर्याय हवा असेल तर तुम्ही Realme X7 5G फोन घेऊ शकता. यात सुपर AMOLED स्क्रीन आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे.(Best 5G smartphones)

हा फोन 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. त्याची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते.