भीम आर्मी महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कट फसला

भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर कांबळे यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या उद्देशाने पुणे भिमा कोरेगाव येथून दंगलखोर मनोहर भिडेचे समर्थक आले होते.

भीम आर्मी महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कट फसला
Bhim Army Maharashtra

बीड जिल्हा प्रतिनिधी विशवनाथ शरणांगत:

दि .15 /9 /2021 भीम आर्मी चे मराठवाडा संपर्क प्रमुख शाम आढ गळे ... गेवराई ..भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर कांबळे यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या उद्देशाने पुणे भिमा कोरेगाव येथून दंगलखोर मनोहर भिडेचे समर्थक आले होते.असे निवेदन पोलीस उपविभागीय विशाल हिरे यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.(Bhim Army Maharashtra)

दिलेल्या निवेदनात उत्तरेश्वर कांबळे यांनी म्हटले आहे हल्लेखोरांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता परंतू तो फसला  सविस्तर माहिती अशी की शनिवार दि.11 रोजी सायंकाळी 5 वाजून 51 मिनिटांनी उत्तरेश्वर कांबळे यांना  फोन आला आणी मी नागेश पवार बोलतोय तुम्हाला भेटायचे आहे.असे म्हणाला त्यावेळी कांबळे म्हणाले तुम्ही कुंभेज फाट्यावर थांबा मी 10/ 15 मिनिटांत येतो.नंतर रस्त्यातच कांबळेंना मित्र भेटल्याने ते अर्धा पाऊण तास तिथेच थांबले .तिथे ते उशिरा गेल्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेले लोक करमाळ्याला निघून गेले.

पुन्हा कांबळे यांनी त्या मोबाईल नंबर वरती काॅल केला आणी म्हणाले मी फाट्यावर आलो आहे.नंतर तिथे ते लोक आलेच नाहीत त्यामुळे कांबळे गावाकडे निघून गेले पुन्हा त्याच नंबर वरून रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी त्यांचा फोन आला आणी तो म्हणाला आम्ही गुळसडीला आलो आहोत आम्हाला इकडे भेटायला या.त्यावेळेस मात्र कांबळे यांना शंका आली.म्हणून त्यांनी फेसबुक वरून माहिती घेतली तर ती धक्कादायक होती.यांचा म्होरक्या सिताराम गंगावणेची पोस्ट होती की नागेश पवार, अक्षय शिंदे ,अमोल गालफडे हे सकाळपासून कुंभेज फाट्यावर समाजकंटकाची वाट पाहत आहेत.असा फेसबुक वरील पुरावा सादर केला आहे.

या कुटील घटनेचे गांभीर्य ओळखून कांबळे यांनी म्होरक्या सिताराम गंगावणे ,महेश कुलकर्णी,अक्षय शिंदे ,नागेश पवार ,अमोल गालफडे यांच्या विरोधात यांनी  निवेदनाच्या प्रती पोलिस अधिक्षक, व पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवून कडक कारवाईची मागणी केली आहे.(Bhim Army Maharashtra)