उपेक्षित,कष्टकरी,कामगार, मागासवर्गीय समाज बांधवांच्या हितासाठी भिम स्वराज्य सेनेचे तीव्र निदर्शने

2 नोव्हेंबर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या बेतात असुन कायम उपेक्षित कष्टकरी मागासवर्गीयांच्या प्रगतीच्या आड येऊन अद्योगती करणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या विरोधात आज भिम स्वराज्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याला समोर तीव्र निदर्शने करत .

उपेक्षित,कष्टकरी,कामगार, मागासवर्गीय समाज बांधवांच्या हितासाठी भिम स्वराज्य सेनेचे तीव्र निदर्शने
Bhim Swarajya Sena

उपेक्षित,कष्टकरी,कामगार, मागासवर्गीय समाज बांधवांच्या हितासाठी भिम स्वराज्य सेनेचे तीव्र निदर्शने

2 नोव्हेंबर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या बेतात असुन कायम उपेक्षित कष्टकरी मागासवर्गीयांच्या प्रगतीच्या आड येऊन अद्योगती करणाऱ्या  सामाजिक न्याय मंत्र्याच्या विरोधात आज भिम स्वराज्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याला समोर तीव्र निदर्शने करत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड 2 नोव्हेंबर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या बेतात असुन कायम उपेक्षित कष्टकरी मागासवर्गीयांच्या प्रगतीच्या आड येऊन अद्योगती करणाऱ्या  सामाजिक न्याय मंत्र्याच्या विरोधात आज भिम स्वराज्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याला समोर तीव्र निदर्शने करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपेक्षित वंचीत कामगार कष्टकरी मागासवर्गीय समाज बांधवांसाठी वेळ प्रसंगी मंत्रालयावर देखील मोर्चा काडू असा इशारा भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी दिला असुन जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन(Bhim Swarajya Sena)


1,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ,संत रविदास महामंडळ,वसंत राव नाईक  महामंडळास भरीव निधी देण्यात यावा तसेच एन एस एफ डी सी व एन एस के एफ डी सी अंतर्गत मंजुर कर्ज प्रस्ताव निकाली काढत लाभार्थ्यांनां कर्ज वितरीत करण्यात यावे.

2 मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

3,बीड जिल्ह्यातील रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ दुसरे व तिसरे अनुदान(हप्ता)वितरीत करण्यात यावा तसेच नुतन प्रस्तावासाठी पन्नास कोटी रु निधीची तरतूद करण्यात यावी.

4,कामगार नोंदणी साठी जिल्हा परिषद,नगर परिषद,पंचायत समित्यानां विशेष अधिकार देऊन विना अट कामगार नोंदणी करण्यात यावी.

5,सामाजिक न्याय विभागा अंतर्गत अनुसूचित जातींच्या सहकारी संस्थानां अर्थसहाय देऊन प्रलंबित पात्र प्रस्ताव मंजूर करन्यात यावेत.

6 सर्वच बाजूने सामाजिक न्याय विभागाला न्याय न देऊ शकलेले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी निष्क्रियतेची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा.

7 बीड जिल्ह्यातील प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट अनुदान वाटप करून नुतन प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत.

8 बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील कष्टकरी,कामगार बांधवाचे 2019 ते 2021पर्यंत सरसकट वीज देयक माफ करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत याप्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड  विकासजी जोगदंड यांचे सह  अशोकजी कांबळे, मंगेशजी जोगदंड, नानाभाऊ कदम, नवनाथ गोरे. आप्पासाहेब चक्रे. सिद्धार्थ सूर्यवंशी. नईम इनामदार. सचिन सोनवणे.महादेव वंजारे, राजेशभाई कोकाटे, गोरख जोगदंड,विष्णु गायकवाड,सचिन जाधव,लक्ष्मण जोगदंड,राजु जोगदंड,आदर्श जोगदंड कमलबाई जोगदंड. नंदाबाई जाधव . सोजरबाई जोगदंड. पारू जोगदंड .इंदुबाई जोगदंड. नीलाबाई जोगदंड. सुमनबाई जोगदंड. सोजरबाई भिक्कु जोगदंड ,आदीं उपस्थित होते.(Bhim Swarajya Sena)