गोड साखरे मागील कडू कष्ट...

सध्या राज्यात पेटलेल्या ऊस कामगार आंदोलनावर मांडलेले मत...

गोड साखरे मागील कडू कष्ट...
Bitter bitterness behind sweet sugar

गोड साखरे मागील कडू कष्ट...


ऊस तोड कामगाराच्या शिकलेल्या मुलाची व्यथा...

सध्या राज्यात पेटलेल्या ऊस कामगार आंदोलनावर मांडलेले मत...

पाच वर्षे सत्तेत असताना ऊसतोड कामगार महामंडळ न करणारे, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची एकही वीट न रचणारे,सत्तेत असताना ऊसतोड कामगारांना भरघोष भाववाढ न देणारे,ऊसतोड कामगार कोरोना काळात अडकला तेव्हा ब्र शब्द न काढणारे विरोधी पक्षनेते आणि पक्षाध्यक्ष यांना व पक्षाला उसतोड कामगारांचा आज पुळका का?

हे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आहेत ते ही पक्षाच्या लेटरपॅड वर...! हे ऐतिहासिक आहे.कारण,स्व.गोपीनाथ मुंडे यांनी उसतोड कामगारांची वज्रमुठ पक्षातीत ठेवली होती.

भाजपने ही आत्मीयता ही तळमळ जर सत्तेत असताना दाखवली असती तर ऊसतोड मजुरांच महामंडळ आणि मुंडे साहेबांचे स्मारक उभ राहिलं असत.मुंडे साहेबांच्या नावाने वियपीठात स्थापन केलेल्या संशोधन केंद्राचे 150 कोटी परत घेतले नसते तर तेही चालू झाल असत!परंतु,तस केल्याने पंकजा मुंडे यांच्यावर टीका करायला आतील बाहेरील विरोधकांना काहीच उरलं नसतं...!

हे कोयते निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव पंकजा मुंडेंवर करत आहेत,त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत..भविष्यात जिंतूर ,पाथर्डी,उदगीर इथे कोण जाईल ?? चंद्रकांत दादांचे आणि विरोधी पक्षनेत्यांचे पत्र ?

मराठवाड्यात कोणाला आमदार, खासदार करणार हे विचारले जात नाही मराठवाड्यातील एक छोटा कार्यकर्ता म्हणून, पूर्वी पक्षात शिस्त होती तशी !!! पण आता काही विचारण्याची सोय नाही. कोयत्यात अस राजकारण चालत नाही.गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे हा विषय अनेक वर्षांपासून व आता दोन महिन्यांपासून हाताळत आहेत.यात त्यांनी कुठेच राजकारण केले नाही.माझा ऊसतोड मजूर राजकीय प्यादा नसून जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.ऊसतोड मजुरांची देखील पंकजाताईंच्या नेतृत्वावर नितांत श्रद्धा आहे.ऊसतोड मजुरांना न्याय मिळावा, त्यांना सन्मानजनक वाढ मिळावी म्हणून पंकजाताईंनी बैठका घेतल्या अनेक नेत्यांशी चर्चा केली !! यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता, ऊसतोड मजुरांना न्याय मिळावा ही त्या मागची प्रामाणिक भूमिका.

कितीही प्रयत्न केले तरी पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेत घट झाली नाही.उलट कट कारस्थानांच्या राजकारणाने त्यांना अधिक मजबूत केले आहे.एका पंकजा मुंडेला राजकारणातून संपवण्यासाठी कुटील डावपेच आखले,षडयंत्र रचले परंतु वंचित उपेक्षितांचा जनसागर समुद्रासारखा दिवसेंदिवस वाढत राहिला.

ही लोकप्रियता आणि ताकद कमी करण्यासाठी उतावीळ झालेल्या कारस्थानी मंडळीनी आता ऊसतोड मजुरांच्या संपात माती कालवण्याचा प्रयोग हाती घेतला आहे.आज पंकजा मुंडेंच्या ऊसतोड कामगार तरी त्यांच्या सोबत का राहावेत अस काही लोकांना वाटत आहे.ज्यांच्या कट कारस्थानांमुळेच आशीर्वादाचा गड गेला,राजकीय गड गेला त्यांना आता ही नाळ जी गोपीनाथ मुंडे साहेबांनी जोडली तिचे असंख्य तुकडे करायचे आहेत,काय कारण ???

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थिने ऊसतोड कामगार अत्यंत अडचणीत आला, तेंव्हा ऊसतोड मजुरांना या संकटातून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी पंकजा मुंडेंनी विधीमंडळाच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पत्र दिले.परंतु,तेंव्हा कुणी दखल घेतली नाही.आता मात्र,त्याच भाजपला पान्हा फुटला आहे.
ऊसतोड मजुरांची सुरक्षा हेच आपले प्राधान्य असलेल्या पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व शरद पवार साहेबांकडे देखील पाठपुरावा केला.जेव्हा कुणीच नव्हते तेंव्हा ऊसतोड मजुरांसाठी पंकजाताईंनी उसाच्या फडात जाण्याची तयारी दाखवली होती! आता राज्यभर बैठका घेणारे आणि त्यांना आदेश देणारे कुठे होते?? 

पंकजा मुंडेंसाठीसाठी ऊसतोड मजूर हा राजकारणाचा आणि श्रेयाचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.पण हे ही नाही करू द्यायच...आता तर नवीन कोणीतरी काढलं ऊसाच्या फडाचे प्रश्न मुंबईत राहून सोडवता येत नाहीत म्हणे, म्हणजे कष्ट करणाऱ्यांचे नेते हे मुंबई, दिल्लीत जाऊच नयेत का ?? शिवारात जाणे, झोपडीत राहणे हे आमच मूळ आहे, ही फोटो काढून राजकारण करण्याची फॅशन नाही..

मुंडे साहेब हेलिकॉप्टरने आले तर कोयत्याला धार यायची,स्टेजवर बसून केसांतून कंगवा फिरवला तर समोर बसलेल्या लोकांमध्ये उत्साह संचारत होता. कारण सर्वसामान्य उपेक्षित,वंचित घटकातून आलेला एक माणूस त्यांच्या उत्कर्षासाठी मुंबई,दिल्लीशी संघर्ष करत होता.अरे कष्टकऱ्यांचा माणूस तुटला पाहिजे असंघटित राहिला पाहिजे हे तर जुनच कारस्थान...पंकजा मुंडे ह्या मुंबईत होत्या तेंव्हाही आणि परदेशात होत्या तेंव्हाही सर्व संबंधित लोकांशी बोलत होत्या.साखर संघाच्या बैठकीत परदेशातून पहाटे 5 वाजता सामील झाल्या.आज पंकजाताई जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात असल्या तरी ज्यांचा कुणी वाली नाही ज्यांची कुणी वाणी नाही अशा लोकांचे प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत !

गावात रहा मुंबईत बसून काय कळेल अस म्हणणारानी मागे वळून बघाव,गावात राहून सर्व काही होणार असेल तर मग शरद पवार काटेवाडीत, विलासराव बाभळगावात आणि गोपीनाथ मुंडे नाथरा येथेच राहिले असते. ते बाहेर पडले,धडपडले घडले आणि त्यांनी अनेक घडवले...आता परिस्थिती वेगळी आहे राज्यात एक ही सभा न घेणारे,जनमाणसात आधार नसलेले निराधार लोक राज्याचा निर्णय घेतील !! आमचे छोटे छोटे झोपडे तुकडे तुकडे करतील स्वतः कधीही न करू शकणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांना ही करू देणार नाहीत... 

पंकजा मुंडे लवादावर असतील किंवा नसतील,कारस्थान जिंकेल,पंकजाताईंची तळमळ आणि त्यांचा प्रामाणिकपणा हरला किंवा त्या संपल्या तरी कोयत्याला न्याय मिळालाच पाहिजे!! ही त्यांची भावना,हाच त्यांचा उद्देश..!! आज त्यांचे कारखाने अडचणीत आहेत परंतु,त्या तळागाळातील अंतिम मनुष्याचा विचार करत आहेत कोरोनामुळे निर्णय वेगळ्या पद्धतीने होत आहेत,नाहीतर फेटा घालून कोयता हातात घेऊन पंकजा मुंडे मैदानात असत्या...मुंडे साहेब देखील एकदा अमेरिकेत होते संपाच्या वेळी..अरे कारस्थानं फार्म हाऊस वर आणि धाब्यावर होतात ते चालत काय ??? मग लवादाचा निर्णय मुंबईत का नाही होणार ???

पंकजाताई लवादावर राहू नयेत,यासाठी आटापिटा कशाला ?? पंकजाताईंच्या नशिबासोबत संघर्षाचा वारसा आहे.ऊसतोड मजुरांच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे पंकजाताईंना तुमच्या आमच्या मनातून कोणी काढू शकणार नाही....
  
पंकजा मुंडे कधी येणार आहेत म्हणून विचारणा करणारांनी काळजी करू नये लवकरच पंकजाताई शिवारात दिसतील.जोपर्यंत पंकजा मुंडे नाहीत तोपर्यंत जे काही करायच ते आटपून घ्या.दौऱ्याचे पत्र तेव्हांही चंद्रकांत दादा देतील की....
 

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके 

_____________

Also see :रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा  अतिश आनंदाराव बारणे यांच्या सौजन्याने संपन्न..

https://www.theganimikava.com/Ambulance-Dedication-Ceremony-Courtesy-of-Atish-Anandarao-Barne