काळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे !

ग्रामस्थांचा धरणाला कडाडून विरोध संघर्ष पेटणार!   

काळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे !
Black dam will not be allowed - MLA Kisan Kathore!
काळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे !

काळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे !
     

ग्रामस्थांचा धरणाला कडाडून विरोध संघर्ष पेटणार!   

 मुरबाड तालुक्यातील २००९ साली प्रस्तावित असलेल्या काळु धरणाला बाधित होणाऱ्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. २००९ साली याच्या संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती . तद्नंतर श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने या धरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन 2012 ला धरणाला  स्थगिती घेतली होती .  परंतु आता ही स्थगिती  २०१९ - २० ला  महाआघाडी सरकारने उठवून मुंबई व  ठाणे करांची तहान भागविण्यासाठी धरण बांधण्याचे निश्चित केले आहे त्यासाठी MMRDA ने पहिल्या टप्प्यासाठी ३५९ कोटीची तरतुद केली असल्याचे बोलले जात असल्याने येथिल बाधित होणारे 12 ग्रामपंचायत ,18 गावे व 23 पाडे यांच्या  जमिनी जावून ते भुमिहिन होणार  असल्याने त्यांनी या धरणास प्रंचड विरोध दर्शविला आहे. 

या संदर्भात  मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रामस्थांची मौजे चासोळे येथे मेळावा घेण्यात आला. धरण होणार या भितीने सर्व ग्रामस्थ विचलीत झाले आहेत .धरण म्हणजे आमचे मरण आहे त्यामुळे आम्ही या धरणासाठी जमिनी देणार नसल्याचा  निर्णय   सर्व ग्रामस्थांनी  यावेळी घेतला.

यावेळी बाधित होत असलेल्या ग्रामस्थांना आमदार किसन कथोरे  यांनी हिंमत न सोडता एकजुटीने संघर्षासाठी तयार राहा . प्रत्येक गावात विरोधाचे बॅनर  लावून शासनाचे लक्ष वेधा. जलसंपदा विभागाच्या एकही आधिकार्याना गावात प्रवेश देऊ नका असे आवाहन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना केले. मुंबई व ठाणे करांची तहान भागविण्यासाठी सरकारला शहापुर व मुरबाडच्या शेतकर्यांच्याच  जमिनी दिसतात का असा टोळा ही यावेळी महाआघाडी सरकारला हाणला . तुमच्या साठी मी स्वःता रस्त्यावर उतरुन संघर्ष करेन असा विश्वास यावेळी आमदारांनी उपस्थित ग्रामस्थ व शेतकर्यांना दिला.

या मेळाव्यासाठी जिल्हा परिषदेच्या  समाज - कल्याण सभापती सौ.नंदा ताई उघडा , उपसभापती सौ. अरुणा  खाकर , खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार ,जि.प.सदस्य  गोविंद भला ,  बारवी प्रकल्प संघटना अध्यक्ष कमलाकर भोईर , माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत , भाजपा जिल्हा ग्रामिण सरचिटणीस नितीन मोहपे , विलास काका देशमुख,अ‍ॅडव्होकेट अशोक फनाडे , हरिभाऊ राऊत व असंख्य ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

 मुरबाड 

प्रतिनिधी -लक्ष्मण पवार   

__________

Also see : तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे –पी.टी काळे

https://www.theganimikava.com/youngsters-should-became-entrepreneurs-by-taking-advantage-of-state-government-and-central-schemes