अरविंद गंडभीर च्या माजी विधर्थ्यांनी केले ब्लॅंकेट वाटप

सध्या थंडीचा मोसम सुरू आहे.मुंबईतील रस्त्यांवर अनेक बेघर कुटुंब ब्रीजखाली,आडोश्याला झोपलेली दिसतात.यात प्रामुख्याने खेळणी व फुगे विकणारे असतात.

अरविंद गंडभीर च्या माजी विधर्थ्यांनी केले ब्लॅंकेट वाटप
Blanket distribution

अरविंद गंडभीर च्या माजी विधर्थ्यांनी केले ब्लॅंकेट वाटप

सध्या थंडीचा मोसम सुरू आहे.मुंबईतील रस्त्यांवर अनेक बेघर कुटुंब ब्रीजखाली,आडोश्याला झोपलेली दिसतात.यात प्रामुख्याने खेळणी व फुगे विकणारे असतात.

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

सध्या थंडीचा मोसम सुरू आहे.मुंबईतील रस्त्यांवर अनेक बेघर कुटुंब ब्रीजखाली,आडोश्याला झोपलेली दिसतात.यात प्रामुख्याने खेळणी व फुगे विकणारे असतात.यांचे रोजचे हातावर पोट. दहा-बारा तास मेहनत करून दिवसाकाठी शे-दोनशे रुपये कमवायचे व गुजराण करायची अशी कसरत सुरू असते.(Blanket distribution)

झोपायला जमीन व आभाळच यांचे छत.एक चादर दोन-तीन जणांनी वापरायची,पाय झाकले तर तोंड उघडे पडते व तोंड झाकले की पाय उघडे.कोणताही महिना,सीझन असो,ऊन,वारा,पाऊस रोजचीच यांची ही कहाणी. अशा लोकांना अरविंद गंडभीर शाळा,जोगेश्वरी पूर्व येथील माजी विधर्थ्यांनी एकत्र येत पदरमोड करत स्वखर्चाने-स्वखुशीने जवळपास दिडशे लोकांना ब्लॅंकेटचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली.

यात प्रामुख्याने किरण वैद्य यांच्या नेतृत्वाखाली-पुढाकाराने २२ जानेवारी  रात्री १० ते २ वाजेपर्यंत मकरंद बाचल,सुनील चव्हाण,सुनील सरदेसाई,मानसी बाचल,शंतनू वैद्य,गणेश हिरवे आदी माजी विधर्थ्यांनी ब्लॅंकेट वाटपासाठी वेळ काढला.संतोष सावंत यांनी अनेक माजी विद्यार्थ्यांना फोन करुन या उपक्रमाची माहिती दिली.यापुढेही अनेक सामाजिक उपक्रम आम्ही माजी विधार्थी राबविणार असल्याचे यानिमित्ताने किरण वैद्य यांनी सांगितले.(Blanket distribution)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/