छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्यां जयंती निमित्ताने नाणे येथे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व वैतरणा नदीच्या तीरावर वसलेल्या नाणे गावातील महालक्ष्मी मंदिरात कृष्णांग सेवाभावी क्रांती नाणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्यां जयंती निमित्ताने नाणे येथे  शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
Blood Donation Camp

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्यां जयंती निमित्ताने नाणे येथे  शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वाडा तालुक्यातील कोहोज  किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व वैतरणा नदीच्या तीरावर वसलेल्या नाणे गावातील महालक्ष्मी मंदिरात   कृष्णांग सेवाभावी क्रांती  नाणे यांनी  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

रविंद्र घरत प्रतिनिधी:

वाडा तालुक्यातील कोहोज  किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व वैतरणा नदीच्या तीरावर वसलेल्या नाणे गावातील महालक्ष्मी मंदिरात   कृष्णांग सेवाभावी क्रांती  नाणे यांनी  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  या रक्तदान शिबिराला  उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.(Blood Donation Camp)

      कृष्णांग सेवाभावी क्रांतीसेवक नितीन वासुदेव पाटील  व सहकारी क्रांतिदुत यांच्या प्रयत्नाने  शिवजयंती उत्साहात साजरी करुन शिवरायांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला जिल्हा परिषद सदस्या अक्षता चौधरी, राजेंद्र चौधरी,सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई राऊत, माजी सभापती संतोष बुकले, gmy कंपनीचे मालक रॉय शेठ यांनी हजेरी लावली. या रक्तदान शिबिरात वसुरी येथील गणेशजी वेखंडे यांनी १५ वेळा रक्तदान करून सहभाग नोंदवला.


       संध्याकाळच्या सुमारास मशाल रॅली काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. दहावीची विद्यार्थिनी कू.कृतिका सचिन पाटील ९५%गुण, कू.निवेदिता पडवळे ८०%गुण बारावी विद्यार्थी कू.गणेश पाटील ८१%गुण कू.कल्याणी पाटील, कू.मोहित पाटील इलेट्रिक इनजिनियर ज्ञानेश्वर घरत,निशांत पाटील,BAF हर्षला पाटील,MA प्रतीक्षा पाटील,कवी व नाट्य अभिनेता कल्पेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर सोनाक्षी प्रोडकशंचे डायरेक्टर प्रफुल  पाटील,विस्तार अधिकारी विजय बाराथे , वकील अविनाश साळवे,अभिनेता धनेश पाटील,केदार जाधव,मंदार पाटील यांच्याकडून कृष्णाग सेवाभावी क्रांती,नाणे यास राष्ट्रीय दर्जा असणारा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार म्हणजे पूर्ण गावाचा केलेला सन्मान आहे.

हा कुणा एकट्याला दिलेला पुरस्कार नसून पूर्ण गावाला दिलेला आहे.अशी प्रतिक्रिया क्रांतीदुत डॉ.राहुल पाटील यांनी केली.या कार्यक्रमाला  तंटामुक्त अध्यक्ष किशोर पाटील, पोलीस पाटील सुरेश पाटील,वासुदेव पाटील, कोंडु पाटील, विठ्ठल पाटील, दशरथ पाटील,राजेंद्र पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  सहकारी क्रांतीदुतांनी खूप मेहनत घेतली.याचे सूत्रसंचालन कल्पेश वसंत पाटील यांनी केले.शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(Blood Donation Camp)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/