रामनगर गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर, गोरेगाव पूर्व यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रामनगर गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न
Blood donation camp

रामनगर गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर, गोरेगाव पूर्व यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर, गोरेगाव पूर्व यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आजच्या शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी आपले कर्तव्य बजावले.(Blood donation camp)

मंडळाचे यंदाचे ४९ वे वर्ष असून पुढील वर्षी सुवर्ण मोहोत्सव साजरे करताना ५० सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती सचिव प्रसाद कदम यांनी दिली.यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यास प्रमाणपत्र व लोकप्रिय हसती दुनिया मासिक देऊन गौरविण्यात आले.नवसाला पावणारा गणपती अशी या गणेशाची ख्याती असून दरवर्षी हजारो गणेशभक्त दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.

मागील दोन वर्षपासून मोठी मूर्ती न आणता शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार येथे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत.यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे लोप पावत चाललेली वारली कला पेंटींगचा देखावा मंडळाने उभारला आहे.

उपनगरातील एक प्रसिद्ध गणपती म्हणून रामनगरचा मोरया ओळखला जातो.आजच्या शिबिराला महिलांचा प्रतिसाद चांगला होता व स्वर्गीय मीनाताई ठाकरे रक्तपेढी गोरेगाव यांचे सहकार्य लाभले.(Blood donation camp)