७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती निमित्ताने पुणे येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते व शाखाप्रमुख विशाल पोरे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
Blood donation camp

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय समजोनत्ती संस्था व अखिल भारतीय नामदेव छीपा समाज महासभा यांच्या संयुक्त विधमाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती निमित्ताने पुणे येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते व शाखाप्रमुख  विशाल पोरे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी महाराष्ट्रातील निवडक २१ सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन " संत नामदेव समाजरत्न गौरव  पुरस्कार २०२१ "  देऊन गौरविण्यात  येणार असल्याची माहिती पदाधिकारी ऍड सागर मांढरे यांनी दिली.रक्तदान शिबिर व पुरस्कार सोहळा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे व यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून या कार्यात योगदान देण्याचे आवाहन पदाधिकारी खेमराज नामा यांनी केले आहे.