निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या शाखा उद्घाटनाचा झंझावात कायम:हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत मोखाडा तालुक्यात ९ शाखांचे उद्धाटन

डोल्हारा,नाशेरा,ठाकुरवाडी,विजवाडा,पारध्याचीमेट,वाकीचापाडा,मोरध्याचापाडा,बेरीस्ते,चिकाटीपाडा या गावांमध्ये यशस्वीरीत्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला..नुकतेच जिजाऊ संस्थेतर्फे जिजाऊ लेकीचे प्रशिक्षण हे रोजगार निर्मिती बद्दल चे प्रशिक्षण संपन्न झाले.

निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या शाखा उद्घाटनाचा झंझावात कायम:हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत मोखाडा तालुक्यात ९ शाखांचे उद्धाटन
Branch of Jijau Institute

माधुरी आहेर मोखाडा:

सर्वांना दर्जेदार आरोग्य,दर्जेदार शिक्षण, महिला सक्षमीकरण याचा प्रामुख्याने विचार करणा-या निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या शाखा उध्दाटनाचा झंझावात कायम असून दि 22 आक्टोंबर वार शुक्रवार रोजी मोखाडा तालुक्यात जिजाऊ च्या ९ शाखांचे उद्घाटन महिला सक्षमीकरण जिल्हाध्यक्ष हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.अतिवृष्टी,वादळ,अवर्षण महापौर,चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत आदिवासी,गरीब,वंचितांच्या मदतीला धावून जाणार्‍या जिजाऊ संस्थेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण असून तरुण व इतर वयोगटातील नागरिक  मोठ्या संख्येने जिजाऊ चे सदस्य होत आहेत.(Branch of Jijau Institute)

आज डोल्हारा,नाशेरा,ठाकुरवाडी,विजवाडा,पारध्याचीमेट,वाकीचापाडा,मोरध्याचापाडा,बेरीस्ते,चिकाटीपाडा या गावांमध्ये यशस्वीरीत्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला..नुकतेच जिजाऊ संस्थेतर्फे जिजाऊ लेकीचे प्रशिक्षण हे रोजगार निर्मिती बद्दल चे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाद्वारे गरजू महिलांना रोजगार निर्मितीसाठी मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभ्या करण्यात येणार आहे.मोतीबिंदू शिबिर, दिव्यांग शिबिर असे अनेक बहुपयोगी शिबिर जिजाऊ तर्फे वर्षभर राबविण्यात येत आहे.त्यामुळे जिजाऊ गावोगावी प्रचंड लोकप्रिय होत आहे़ असे चित्र दिसत आहे.यावेळी चक्रवर्ती,जिजाऊ चे शाखा प्रमुख व स्वयंसेवक उपस्थित होते.(Branch of Jijau Institute)