आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी निकाल

CISCE Result 2021 परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे.

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी निकाल
CISCE Result 2021

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी निकाल

CISCE Result 2021 परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. 

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन 10 वी व 12 वीचे निकाल  जाहीर होणार आह आयसीएसईचे सचिव गॅरी अरथून यांनी शुक्रवारी ही माहिती दिली होती. अरथून म्हणाले की, “दहावी आणि बारावीचा निकाल आज दुपारी 3 वाजता जाहीर केले जातील. आयसीएसईचा  निकाल  परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल.(CISCE 10th 12th results live updates today)

cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. तर, एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.दहावीचा आणि बारावीचा निकाल एसएमएसद्वारे मिळवू शकतात. एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ICSE/ISC Unique ID लिहून 09248082883 या क्रमांकावर पाठवल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उपलब्ध होऊ शकेल.आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचा निकाल cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.


-विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्यावी.
-वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-रोल नंबर किंवा इतर सबमिट करा.
-यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
-निकालाची प्रत सेव्ह करुन ठेवा किंवा प्रिंट आऊट घ्या


आयसीएसईनं कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. बोर्डाने पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचं ठरवलं आहे. अरथून म्हणाले की मागील वर्षांप्रमाणेच यंदा उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही कारण विद्यार्थ्यांना विहित पद्धतीने गुण देण्यात आले आहेत.निकालात काही त्रुटी सल्यास त्या सुधारण्यासाठी शाळांकडे दाद मागता येणार आहे.

सीआयएससीईनं विद्यार्थ्यांच्या 2015 पासून ते 2020 पर्यंतच्या गुणांचा आधार घेत निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आयसीएसईनं 17 जून 2021 रोजी बारावीच्या निकालासंदर्भातील मूल्याकनाचं सूत्र जाहीर केलं होतं. निकालाचं सूत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याला मंजुरी दिली होती.(CISCE 10th 12th results live updates today)

दहावीचा निकाल नववी आणि दहावीच्या अंतर्गत मू्ल्यमापनातील गुणांच्या आधारे सादर केला जाणार आहे.